शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

असं कसं झालं बाई; पोरगी अचानकच झाली आई!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2019 15:28 IST

चीनच्या गुइयांग शहरात एक विचित्र घटना समोर आली आहे. इथे एका तरूणीला पोटात वेदना होत असल्याने रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

(Photo Credit : AmarUjala)

चीनच्या गुइयांग शहरात एक विचित्र घटना समोर आली आहे. इथे एका तरूणीला पोटात वेदना होत असल्याने रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण त्यानंतर या तरूणीने डॉक्टरांना जे काही सांगितलं त्याने डॉक्टरही चक्रावून गेले. ही तरूणी रूग्णालयात दाखल झाल्यावर तिलाही तेव्हाच अचानक कळालं की, ती गर्भवती आहे. पण गर्भवती महिलेने दावा केला की, तिचा कुणीही बॉयफ्रेन्ड नाहीये. मी अजून पूर्णपणे व्हर्जिन आहे. आश्चर्याची बाब म्हणजे व्हर्जिन असल्याचा दावा करणाऱ्या तरूणीने एका बाळालाही जन्म दिला. हे डॉक्टरांनाही बुचकळ्यात टाकणारं आहे. 

मिररने दिलेल्या वृत्तानुसार, डॉक्टरांनी जेव्हा तपासणी सुरू केली तेव्हा तरूणीने डॉक्टरांच्या सांगण्यावर विश्वास ठेवण्यास नकार दिला. तरूणीची म्हणणं आहे की, तिने कधीच कुणाशीही शारीरिक संबंध ठेवले नाहीत. तिचा बॉयफ्रेन्ड सुद्धा नाही. 

डॉक्टरांनी तिला विचारले की, कधी नशेच्या स्थिती तिने कुणाशी शारीरिक संबंध ठेवले का? यावर ती म्हणाली की, मद्यसेवनाची तिला अॅलर्जी आहे. ती दारूला हातही लावत नाही. ही तरूणी शिकलेली असतानाही असं बोलत असल्याने डॉक्टरांना या प्रकरणाचं अधिकच आश्चर्य वाटलं.  

डॉक्टरांनी सांगितलं की, एखाद्या तरूणीला थेट डिलिवरीच्या वेळी ती गर्भवती असल्याचं कळणे अशा घटना याआधीही घडल्या आहेत. या तरूणीचं वजन जास्त होतं आणि तिची मासिक पाळीही असामान्य राहत होती. त्यामुळे तिला कळालेच नाही की, ती गर्भवती आहे. 

काही वेळा रूग्णाच्या आग्रहावरून फार कमी केसेसमध्ये सी-सेक्शन करण्याआधी व्हर्जिनिटी टेस्ट केली जाते. या तरूणीनेही डॉक्टरांवर व्हर्जिनिटी टेस्ट करण्यासाठी दबाव टाकला. कारण तिच्या म्हणण्यानुसार तिने कधीच कुणाशी शारीरिक संबंध ठेवले नव्हते. पण डॉक्टरांना तिला समजावून सांगण्यास फार वेळ लागला.  

शेवटी डॉक्टरांनी तरूणीवर एक इमरजन्सी सी-सेक्शन करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा या तरूणीने एका मुलाला जन्म दिला. मात्र तरूणीने या नवजात बाळाचा स्विकार करण्यास नकार दिला. असे सांगितले जात आहे की, रूग्णालयाने तरूणीच्या आई-वडिलांकडे या बाळाला सोपवले. पण अजून या बाळाला दत्तक दिलं जावं की, नाही याबाबत काहीही निर्णय घेतला नाहीये. रिपोर्ट्सनुसार, महिला एकटी राहते. तिने तिच्या वजनामुळे व अनियमित मासिक पाळीमुळे ती गर्भवती असल्याकडे लक्षच दिलं नाही. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेchinaचीनPregnancyप्रेग्नंसी