शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

'माझे मंगळसूत्र माझा स्वाभिमान', पु.ना. गाडगीळच्या जाहिरातीवर सोशल मीडियातून टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2017 17:37 IST

पु.ना. गाडगीळच्या या जाहिरातीवर अनेकांनी रोष व्यक्त केला असून महिलांनी तर थेट नाराजी व्यक्त करत टिकास्त्रच सोडलं आहे

ठळक मुद्देपु.ना.गाडगीळ ज्वेलर्सतर्फे मंगळसूत्र महोत्सव घेण्यात येत आहेया महोत्सवाची जाहिरात करताना 'माझे मंगळसूत्र माझा स्वाभिमान' अशी टॅगलाईन वापरण्यात आली आहेपु.ना. गाडगीळ ज्वेलर्सचे संचालक पराग गाडगीळ यांनी मात्र जाहिरातीतील उल्लेखाचा समर्थन केलं असल्याची माहिती आहे

मुंबई, दि. 29 - सध्या सोशल मीडियावर पु.ना. गाडगीळच्या एका जाहिरातीची चांगलीच चर्चा रंगली आहे. पु.ना. गाडगीळच्या या जाहिरातीवर अनेकांनी रोष व्यक्त केला असून महिलांनी तर थेट नाराजी व्यक्त करत टिकास्त्रच सोडलं आहे. ही जाहिरात आहे मंगळसूत्राची. 'माझे मंगळसूत्र माझा स्वाभिमान' या टॅगलाईनसहित ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. पुण्यात अनेक ठिकाणी या जाहिरातीचे बॅनर्सही लागलेले पहायला मिळत आहेत. जुने विचार मांडणा-या पु.ना. गाडगीळला अजूनही फक्त मंगळसूत्रच आपला अभिमान आहे असं वाटतं का ? असे सवाल महिलावर्गाकडून विचारले जात आहेत. 

पु.ना. गाडगीळ हे नाव तसं काही नवं नाही. अनेकजण दागिने विकत घेताना पु.ना. गाडगीळला पसंती देतात. मात्र यावेळी एका भलत्याच कारणासाठी पु.ना. गाडगीळ महिलावर्गात चर्चेला आला आहे. पु.ना.गाडगीळ ज्वेलर्सतर्फे मंगळसूत्र महोत्सव घेण्यात येत आहे. २४ जुलै ते २४ ऑगस्ट दरम्यान हा महोत्सव पार पडणार आहे. या महोत्सवाची जाहिरात करताना 'माझे मंगळसूत्र माझा स्वाभिमान' अशी टॅगलाईन वापरण्यात आली आहे.

महिला वर्गात अजूनही मंगळसूत्राला तितकंच महत्वं आहे. आपली परंपरा आणि संस्कृती दर्शवणारा दागिना म्हणून मंगळसूत्र वापरलं जातं. जुन्या काळातील महिला अजूनही मंगळसूत्राला तितकंच महत्व देत असून सौभाग्याचं लेणं म्हणून जपत असतात. पण आजच्या पिढीतील तरुणी किंवा महिलांबद्दल बोलायचं झाल्यास त्यांना हे मान्य नाही. मंगळसूत्र इतर दागिन्यांप्रमाणे एक दागिना असून त्याचं महत्व अमान्य नाही. पण मंगळसूत्राला स्वाभिमान म्हणणं त्यांना पटत नाही. काही महिलांनी आम्ही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आत्मविश्वासाने वावरत असताना अद्यापही जुन्या परंपरांमध्ये का अडकवत आहात असा सवाल विचारला आहे. तर काहींनी आत्मविश्वास हा स्त्रीचा स्वाभिमान असल्याचं मतं व्यक्त केलं आहे.

सोशल मीडियावर पु.ना.गाडगीळच्या जाहिरातीवर टीका होत आहे. परंतु,  पु.ना. गाडगीळ ज्वेलर्सचे संचालक पराग गाडगीळ यांनी मात्र जाहिरातीतील उल्लेखाचा समर्थन केलं असल्याची माहिती आहे.