शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
3
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
4
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
5
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
6
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
7
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
8
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
9
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
10
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
11
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
12
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
13
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
14
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
15
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
16
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
17
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
18
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
19
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
20
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!

थरार! लँड होता होता विमानाने केलं टेक अॉफ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2017 19:10 IST

एक विमान धावपट्टीवर लँड होता होता पुन्हा अचानक उडू लागलं. त्यामुळे नक्की काय होतंय हे आतल्या  प्रवाशांना कळलंच नाही.

ठळक मुद्देऑस्ट्रीयामधील सल्झर्बग या विमानतळावर फ्लाईट लँड होत असताना ही घटना घडली.विमान धावपट्टीवर उतरण्याआधीच पुन्हा विमानाने टेक ऑफ घेतल्याचा थरार या व्हिडिओमध्ये स्पष्ट कैद झालाय. पायलटच्या हुशारीमुळे मोठा अपघात होण्याचं टळलं, असं प्रत्यक्षदर्शी म्हणताहेत.

ऑस्ट्रीया : काळजाचा ठोका चुकवणारी एक घटना नुकतीच सल्झर्बग या विमानतळावर घडली. एक  विमान धावपट्टीवर लँड होता होता पुन्हा अचानक उडू लागलं. धावपट्टीवरच्या हवेच्या तीव्र झोतामुळे पायलटला पुन्हा हे विमान उडवावं लागलं. त्यामुळे नक्की काय होतंय हे आतल्या  प्रवशांना कळलंच नाही. म्हणून विमानात एकच कल्लोळ उठला होता.

ऑस्ट्रीयामधील सल्झर्बग या विमानतळावर सोमवारी सकाळी दि पॉलिश एन्टर एअर फ्लाईट लँड होत असताना ही घटना घडली. विमान खाली उतरत असताना अचानक वादळ निर्माण झालं. त्यामुळे विमानातील पायलटलाही नेमकं काय करावं हे कळलं नाही. पायलटने पुन्हा हे विमान जर्मनीच्या फ्रँकफ्रिडकडे वळवले. हा सगळा थरार एका व्हिडिओमध्ये कैद झाला आहे. विमान धावपट्टीवर उतरण्याआधीच पुन्हा विमाने टेक ऑफ घेतल्याचे या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय. व्हिडीयो पाहण्यासाठी येथे क्लिक करा

तर याचप्रमाणे याच विमानाचा दुसरा व्हिडिओही समोर आला आहे. या दुसऱ्या व्हिडिओमध्ये प्रवाशांनी आतील बाजूने विमानाचे पंख हवेच्या झोताने कशाप्रकारे उडत होते हे दाखवलं आहे. या परिसरात हवेचा दाब जास्त असल्याने विमानाच्या पंखांवरही त्याचा परिणाम जाणवत होता. पायलटच्या हुशारीमुळे मोठा अपघात होण्याचे टाळले असंही म्हटलं जात आहे. त्याने काळी वेळ विमान तसेच आकाशात फिरते ठेवलं. वातावरण शांत झाल्यावर विमान शिताफीने खाली  उतरवलं. शेवट सुखाचा झाल्यानंतर विमानतळावरील कर्मचारी, प्रवासी आणि इतरांनी सुटकेचा श्वास सोडला.

सौजन्य - www.thesun.co.uk

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयMumbaiमुंबईAirportविमानतळ