Pig Sperm : डुकराची बरीच चर्चा फॅन्ड्री सिनेमावेळी झाली होती. पण डुक्कर हा असा प्राणी आहे ज्याची फार कुणी चर्चा करत नाही. हा एक फार घाणेरडा आणि किळसवाणा प्राणी समजला जातो. पण आपल्याला वाचून आश्चर्य वाटेल की, सध्या याच डुकराच्या स्पर्मची म्हणजे विर्याची चर्चा जोरदार सुरू आहे. कारण संशोधकांनी यापासून एका दुर्मिळ आणि गंभीर आजारावर उपचार शोधला आहे. डुकराच्या विर्याचा वापर एक औषध बनवण्यासाठी केला जाऊ शकतो, असा दावा डॉक्टरांनी केलाय अशात हे कोणत्या आजारावर फायदेशीर ठरतं हे जाणून घेऊया.
गेल्या काही वर्षांमध्ये कॅन्सरवर उपचार शोधण्यासाठी वेगवेगळे शोध करण्यात येत आहेत. अशातच डोळ्याच्या एका कॅन्सरवर उपचार सापडल्याचा दावा डॉक्टरांनी केला आहे. आता डुकराच्या स्पर्मने हा आजार बरा केला जाऊ शकेल. रेटिनोब्लास्टोमा हा डोळ्यांचा एक घातक कॅन्सर आहे. हा सामान्यपणे नवजात बाळ आणि लहान मुलांना प्रभावित करतो. यावर उपचार करणं फारच अवघड असतं. आता एका नव्या पद्धतीने यावर उपचार करता येईल असा दावा केला जात आहे.
न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, सायन्स अॅडव्हांसेजमध्ये प्रकाशित शोधात असं आढळून आलं की, डुकराच्या स्पर्मनमध्ये असलेल्या कोशिकांनी सोडलेल्या छोट्या वेसिकल, ज्यांना एक्सोसोम म्हटलं जातं. त्याच्या विशेष प्रोटीनच्या मदतीने जैविक अडचणी पार केल्या जाऊ शकतात.
शोधादरम्यान डॉक्टरांनी डुकराच्या स्पर्ममध्ये काही घटक मिक्स करून एक ड्रॉप तयार केला. या ड्रॉपने निरोगी कोशिकांचं नुकसान न होता, कॅन्सरच्या कोशिका नष्ट होतात. सध्या या औषधाचा प्रयोग उंदरांवर करण्यात आला आणि संशोधकांना आशा आहे की, पुढे मानवांवर प्रयोग करण्याआधी यात आणखी काही शोध करणे गरजेचे आहे. तेव्हाच याचा एक उपचार म्हणून वापर केला जाऊ शकतो.
Web Summary : Scientists are exploring pig sperm for treating retinoblastoma, a rare eye cancer affecting children. A new study suggests that exosomes from pig sperm can target and destroy cancer cells without harming healthy ones. Initial tests on mice are promising, paving the way for potential human trials.
Web Summary : वैज्ञानिक रेटिनोब्लास्टोमा, बच्चों को प्रभावित करने वाले एक दुर्लभ नेत्र कैंसर के इलाज के लिए सुअर के शुक्राणु की खोज कर रहे हैं। एक नए अध्ययन से पता चलता है कि सुअर के शुक्राणु से एक्सोसोम स्वस्थ कोशिकाओं को नुकसान पहुंचाए बिना कैंसर कोशिकाओं को लक्षित और नष्ट कर सकते हैं। चूहों पर प्रारंभिक परीक्षण आशाजनक हैं, जिससे संभावित मानव परीक्षणों का मार्ग प्रशस्त होता है।