शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नेकेड बाइक राइडमध्ये अंतर्वस्त्र घालण्यास मनाई, पण मास्क घालणं अनिवार्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2021 10:39 IST

यात सहभागी होणारे महिला-पुरूष आपल्या शरीरावर एकही कपडा घालणार नाहीत. पण त्यांना तोंडावर मास्क लावणं गरजेचं असणार आहे.

अमेरिकेच्या फिलाडेल्फीया शहरात दरवर्षी नेकेड बाइक राइडचं म्हणजे पूर्णपणे नग्न होऊन बाइक राइडचं आयोजन केलं जातं. दरवर्षी शेकडो महिला-पुरूष यात सहभागी होतात. मात्र, यावर्षी हे आयोजन खास असणार आहे. यात सहभागी होणारे महिला-पुरूष आपल्या शरीरावर एकही कपडा घालणार नाहीत. पण त्यांना तोंडावर मास्क लावणं गरजेचं असणार आहे.

म्हणजे याचा अर्थ असा असणार आहे की, हजारोंच्या संख्येने यात सहभागी होणारे लोक ना पॅंट-शर्ट ना कोणताही कपडा अंगावर घालणार. इतकंच काय तर त्यांना अंतर्वस्त्र घालण्याचीही परवानगी नसेल. पण यादरम्यान कोरोना व्हायरस प्रोटोकॉलमुळे सर्वांना तोंडावर मास्क लावणं अनिवार्य असेल. संपूर्ण शरीरावर मास्कशिवाय दुसरा कपडा नसेल.

यावर्षी या खास राइडचं आयोजन २८ ऑगस्टला करण्यात येणार आहे. फिलाडेल्फीयामध्ये कोरोना व्हायरससंबंधी घालण्यात आलेल्या बंदी उठवण्यात आल्या आहेत आणि संक्रमणाचं प्रमाणही कमी झालं आहे. मात्र, अशातही स्थानिक प्रशासनाला कोणतीही रिस्क घ्यायची नाहीये. या न्यूड बाइक राइडआधी तिथे वॅक्सीनेशनही वेगाने केलं जात आहे. जेणेकरून राइडआधी जास्तीत जास्त लोकांना वॅक्सीन दिली जावी. (हे पण वाचा : स्पर्म डोनेशनमधून जन्माला आलेल्या तरूणीचे शोधले तिचे ६० भाऊ--बहीण, रिअल 'विक्की डोनर' आहे वडील)

न्यूड बाइक राइडचे आयोजक वेसली नूनान सेसा म्हणाले की, या कार्यक्रमात भाग घेणाऱ्या लोकांना मास्क लावण्यास सांगण्यात आले आहे. मात्र, त्यांना आशा आहे की, कोरोनासंबंधी नियमांमध्ये येत्या महिन्यात सूट दिली गेली तर कुणाला मास्क लावण्याचीही गरज पडणार नाही.

या खास राइडमध्ये सहभागी लोकांना साधारण १६ किलमीटरपर्यंत बाइक किंवा सायकल चालवायची असते. यात पुरूषच नाही तर महिलाही मोठ्या प्रमाणात सहभागी होतात. दरवर्षी हजारो लोक या राइडमध्ये सहभागी होतात. त्यामुळे आता यावर्षीच्या राइडकडे सर्वांच लक्ष राहणार आहे.  

टॅग्स :AmericaअमेरिकाJara hatkeजरा हटके