शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
4
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
5
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
6
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
7
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
8
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
9
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
10
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
11
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
12
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
13
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
14
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
15
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
16
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
17
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
18
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
19
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
20
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा

फणींद्र सामा : तिकीट मिळाले नाही, कंपनीच उघडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2024 09:18 IST

इन्स्पायरिंग : अनेक ट्रॅव्हल एजंट आणि बस ऑपरेटर्सना भेटलो. पण, मला सीट मिळू शकली नाही.

खरंतर उद्योजकतेविषयी प्रारंभी मला काहीही माहिती नव्हते. मी बंगळुरूमध्ये काम करीत होताे आणि माझे आईवडील हैदराबादमध्ये होते. ते घरी जाण्यासाठी नेहमी बसने प्रवास करायचे. तिकिटासाठी मी ट्रॅव्हल एजंटाकडे जायचो आणि तो मला जागा मिळवून द्यायचा. पण, २००५ च्या दिवाळीत घरी जाण्यासाठी मी तिकीट बुक करायला गेलो. तेव्हा अनेक ट्रॅव्हल एजंट आणि बस ऑपरेटर्सना भेटलो. पण, मला सीट मिळू शकली नाही.

पहिल्या एजंटाने सांगितले की, तुम्ही दुसऱ्याशी संपर्क करून पाहा. असे करत मी तब्बल सहा ते सात एजंटांना भेटलो. कुणाकडूनच तिकीट न मिळाल्याने मला आश्चर्य वाटले की ट्रॅव्हल एजंट असूनही यांना बसमध्ये एक सीट रिकामी आहे की नाही हे ठाऊक नाही. सीट न मिळाल्याने दुसऱ्या दिवशी मला खूप वाईट वाटले आणि या समस्येतूनच ऑनलाइन तिकीट बुकिंग प्लॅटफॉर्म या संकल्पनेचा जन्म झाला आणि हे स्टार्टअप यशस्वी झाले. 

लाेक एक प्रश्न मला विचारायचे आधी मी अनेक कार्यक्रमात जायचो. तेव्हा लोक सतत मला एक प्रश्न विचारायचे की, चांगली नोकरी सोडून तुम्ही एका व्यवसायाला सुरूवात का केली? पण, आज हा प्रश्न मला कुणीच विचारत नाही. कारण नवीन उद्योगाविषयी मानसिकतेत मोठा बदल झाला आहे. 

शिकण्याची संधी... - स्वप्ने पाहा, कारण तेच आपल्या कार्याची प्रेरणा बनतात.- संघर्ष न करता कोणतेही यश मिळत नाही, त्यामुळे मेहनत करा.- आपल्या विचारांमध्ये खूप शक्ती आहे, त्यांना सकारात्मक ठेवा.- जीवनात मोठा टप्पा गाठायचा असेल तर आधी छोटे छोटे टप्पे गाठा. - कधीही हार मानू नका; प्रत्येक चुकामध्ये काहीतरी शिकण्याचीसंधी असते.- विचारपूर्वक निर्णयाला मेहनतीची जोड दिली की यश मिळते. 

सात हजार कोटींचा बिझनेसफणींद्र सामा यांनी अवघे पाच लाख रुपये गुंतवून आज सात हजार कोटी रुपयांचा बिझनेस उभा केला. त्यांचे स्टार्टअप आज देशभरात प्रसिद्ध आहे. कॉलेजमध्ये भेटलेल्या दोन मित्रांना सोबत घेऊन त्यांनी बिझनेस आयडिया प्रत्यक्षात उतरवली आणि यशस्वी करून दाखवली.

(संकलन : महेश घोराळे)

टॅग्स :Jara hatkeजरा हटके