शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बाबो! या भावाने बहिणीच्या वेडिंग केकमध्ये मिसळला गांजा! समोर आलं हे धक्कादायक कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2022 15:41 IST

सॅंटियागोच्या २९ वर्षीय अल्वारो रॉड्रिग्जने आपल्या बहिणीसाठी सात थरांचा केक बनवला आणि फक्त एका थरात भांग टाकली. मात्र, या एका थराने आपलं काम केलं आणि लग्नात केक खाणारे सगळे पाहुणे नशेत दिसले.

चिलीमधील एका व्यक्तीने भांग घालून बहिणीच्या लग्नाचा केक बनवला (Wedding Cake). हा केक खाल्ल्यानंतर पाहुणे मद्यधुंद झाले. सॅंटियागोच्या २९ वर्षीय अल्वारो रॉड्रिग्जने आपल्या बहिणीसाठी सात थरांचा केक बनवला आणि फक्त एका थरात भांग टाकली. मात्र, या एका थराने आपलं काम केलं आणि लग्नात केक खाणारे सगळे पाहुणे नशेत दिसले.

बेकरला केक बनवण्यासाठी आणि सजवण्यासाठी २० तास लागले होते. हा सामान्य केकसारखा दिसावा यासाठी त्याने खूप मेहनत घेतली आणि त्यात तो यशस्वीही झाला. इतकंच नाही तर हा अतिशय सुंदर वेडिंग केक होता. चिलीमधील लग्नाचा एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला होता, ज्यामध्ये एक जोडपं केक कापताना दिसत होतं आणि नंतर नशेत पाहुणे नाचताना दिसत होते. या व्हायरल व्हिडिओला आतापर्यंत १३ मिलियन अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. केकमागील प्रेरणाचे वर्णन करताना, अल्वारोने सांगितलं की पाहुण्यांनी आणि त्याच्या बहिणीने जादुई ब्राउनीज खाल्ले होते, ज्यात भांग होतं आणि त्याचा परिणाम खूप मजेदार होता.

बहिणीने तिच्या लग्नाच्या केकमध्ये तिला हीच चव हवी असल्याचं सांगितलं होतं. बहिणीच्या मागणीनंतर त्याबद्दल कोणताही विचार न करता भावाने त्याचं अनुसरण केलं आणि ७ थरांपैकी एका थरात भांग मिसळली. अल्वारोने माध्यमांशी बोलताना सांगितलं की केकची "जादुई" शक्ती सर्व पाहुण्यांना आधीच सांगितली गेली होती. तसंच केकचा तो थर लहान मुलांना दिला जाऊ नये, याची विशेष काळजी घेण्यात आली होती. वय लक्षात घेऊनच पाहुण्यांना हा केक देण्यात आला. तो म्हणाला की सर्वात मजेदार प्रतिक्रिया माझ्या मावशीची होती.

अल्वारो म्हणाला, मला आठवतं केक खाण्यापूर्वी ती तिच्या पाठदुखीबद्दल सांगत होती पण केक खाल्ल्यानंतर दोन तासांनी तिचं दुखणं नाहीसं झालं आणि ती एखाद्या तरुणीसारखं नाचत होती. चिली सरकारने 2015 मध्ये भांगचा वापर करणं गुन्हेगारीपासून मुक्त केलं होतं. मात्र याचा केवळ वैयक्तिक (घरी) वापर बेकायदेशीर आहे.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके