शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

बोंबला! पासपोर्टच्या फाटलेल्या पानांमुळे पतीचं पितळ पडलं उघडं, विमानतळावरच पत्नीचं तांडव

By अमित इंगोले | Updated: November 23, 2020 11:35 IST

ही व्यावसायिक व्यक्ती आपल्या पत्नीसोबत दुबईला जाण्यासाठी आयजीआय केटी-३ एअरपोर्टवर आली होती. जाण्याच्या तयारीत इमिग्रेशन अधिकारी त्यांचा पासपोर्ट चेक करत होते.

आपल्याच काही चुकांमुळे पतीचं पत्नीसमोर बिंग फुटल्याच्या अनेक घटना तुम्ही ऐकल्या किंवा वाचल्या असतील. मात्र, नवी दिल्लीतील आयजीआय केटी-3 एअरपोर्टवर घडलेली अशीच एक घटना चर्चेचा विषय ठरत आहे. इथे एक उद्योगपती पत्नीसोबत दुबईला निघाला होता. पण पासपोर्टमधील फाटलेल्या पानांमुळे सगळाच गोंधळ झाला. या फाटलेल्या पानांमुळे पत्नीसमोर पतीचा कारनामा समोर आला आणि यावरून दोघांमध्ये एअरपोर्टवरच खटके उडाले. चेकिंगदरम्यान हा संपूर्ण धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानं मोठा गोंधळ उडाला.

ही व्यावसायिक व्यक्ती आपल्या पत्नीसोबत दुबईला जाण्यासाठी आयजीआय केटी-३ एअरपोर्टवर आली होती. जाण्याच्या तयारीत इमिग्रेशन अधिकारी त्यांचा पासपोर्ट चेक करत होते. मात्र, व्यावसायिकाच्या पासपोर्टमधील सुरूवातीची दोन पाने फाटलेली दिसली. अधिकाऱ्यांनी लगेच चौकशी देखील केली. याबाबत विचारणा करण्यात आल्यावर व्यावसायिकाने मला याबाबत माहीत नाही, अशी उडवा उडवीची उत्तरं पत्नीसमोर दिली. आता आपलं बिंग फुटणार हे लक्षात आल्यावर व्यावसायिकाने इमिग्रेशन अधिकाऱ्यांना बाजूला घेऊन मी सगळं सांगतो फक्त पत्नीसमोर नको, असा विश्वास दाखवण्याचा प्रयत्न केला. हे समजताच पत्नीने तिथे गोंधळ सुरू केला.

पत्नी हट्टाला पेटली की, जी चौकशी करायची आहे आणि जे सांगायचं ते माझ्यासमोर सांगा. मी इथून बाहेर जाणार नाही, असं सांगत पत्नीने तिथेच गोंधळ सुरू केला. पुढे चौकशीदरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे. चौकशीतून समोर आलं की, हा व्यावसायिक पती याआधी दोन वेळा पत्नीला न सांगता थायलंड टूरवर गेला होता. एकदा तो बनारसहून थायलॅंड आणि दुसऱ्यांदा कोलकाताहून थायलँडला गेल्याचं उघड झालं. 

आता या पतीचा हा कारनामा समोर आल्यावर पत्नी संतापली आणि तिने पतीसोबत दुबईला जाण्यास देखील नकार दिला. पत्नीला कळू नये म्हणून पतीनं पासपोर्टची पाने फाडली होती. मात्र त्याचा हा प्लॅन सर्वांसमोर उघड झाला. आता पासपोर्टसोबत छेडछाड केल्याप्रकरणी व्यावसायिकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्यावसायिक दोनवेळा थायलंडला कशासाठी आणि कुणासोबत गेला होता हे समजू शकले नाही. या प्रकरणी पोलिसांकडून सध्या चौकशी सुरू आहे. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेCrime Newsगुन्हेगारीNew Delhiनवी दिल्लीAirportविमानतळ