शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
2
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
5
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
6
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
7
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
8
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
9
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
10
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
11
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
12
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
13
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
14
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
15
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
16
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
17
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
18
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
19
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
20
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार

फुटबॉलरच्या किकने उडते विमान कोसळले, 60 वर्षांपूर्वी नेमकं काय झालं होतं? वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2022 17:17 IST

रॉबर्ट गॅब्रिएल ट्रायगो नावाच्या फुटबॉलपटूने एका किकमध्ये उडते विमान पाडले होते. वाचा धमाल किस्सा...

Footballer Brought Down a Flying Plane : फुटबॉल हा जगातील अनेक देशात खेळला जाणारा खेळ आहे. जगभरात क्रिकेटपेक्षा जास्त फुटबॉलचे चाहते आहेत. फुटबॉल खेळात अनेकदा अनपेक्षित गोष्टी घडत असतात. अशीच एक अनपेक्षित आणि विश्वास न बसणारी घटना 60 वर्षांपूर्वी घडली होती. एका 17 वर्षीय फुटबॉलपटूने इतकी जोरदार किक मारली होती की, उडते विमान कोसळले होते. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण ही घटना खरी आहे. एका पॅराग्वेयन फुटबॉलपटूने वयाच्या अवघ्या 17व्या वर्षी उडते विमान फुटबॉलने पाडले होते. 

एका शॉटमध्ये विमान पाडलेफुटबॉलपटू रॉबर्ट गॅब्रिएल ट्रायगो(Roberto Gabriel Trigo) आज 80 वर्षांचे झाले आहेत. हा पराक्रम केला, तेव्हा ते अवघ्या 17 वर्षांचे होते. रॉबर्ड तेव्हा असुनसियनच्या जनरल जीन्स फुटबॉल क्लबमध्ये खेळायचे. काही लोक म्हणतात की, ते सराव सामना खेळत होते, तर काही लोक म्हणतात की त्यांनी अधिकृत सामन्यात हा पराक्रम केला. 

नेमकं काय झालं...

स्पॅनिश न्यूज एजन्सी EFE शी बोलताना रॉबर्टो म्हणाले की, 'विमान उडवणारा व्यक्ती त्यांच्या ओळखीचा होता. तो सातत्याने जमिनीपासून कमी उंचीवर विमान उडवत होता. त्यांना त्याला अनेकदा खडसावले, पण तो ऐकायला तयार नव्हता. त्यांनी वैमानिकाला फुटबॉल मारुन विमान खाली पाडण्याचा इशाराही दिला होता. अखेर 1957 च्या फेब्रुवारीमध्ये वैमानिक परत विमान कमी उंचीवर उडवत होता.

राहिल्या फक्त आठवणीयानंतर चिडलेल्या रॉबर्टो यांनी फुटबॉलला इतकी जोरात किक मारली की, तो सरळ जाऊन विमानाच्या इंजिनला धडकला आणि विमान मोकळ्या मैदानात कोसळले. ही घटना जमिनीपासून अवघ्या 200 मीटर अंतरावर घडली. यानंतर विमान अपघातामुळे ते अस्वस्थ झाले, पण पायलट सुखरूप असल्याचे समजल्यावर त्यांच्या जीवात जीव आला. आता जनरल जीन्स क्लब राहिलेला नाही, पण त्याचे किस्से आजही प्रसिद्ध आहेत. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटके