शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Video - नवरदेवाने चक्क नवरीला लग्नात गिफ्ट म्हणून दिलं गाढव; कारण ऐकून म्हणाल अरे व्वा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2022 12:44 IST

तुम्हाला जण कोणी लग्नामध्ये गाढव गिफ्ट म्हणून दिल्याचं सांगितलं तर खोटं वाटेल किंवा विश्वासच बसणार नाही. पण हो हे खरं आहे.

लग्न समारंभात भन्नाट किस्से हे घडत असतात. हल्ली मित्र- मैत्रिणी नवरी आणि नवरदेवाला हटके गिफ्ट देतात. काही जण रिकामा बॉक्स तर काही रोजच्या वापरातल्या साबण, झाडू अशा गोष्टी लग्नात देतात. यामुळे गंमत येते. मात्र तुम्हाला जण कोणी लग्नामध्ये गाढव गिफ्ट म्हणून दिल्याचं सांगितलं तर खोटं वाटेल किंवा विश्वासच बसणार नाही. पण हो हे खरं आहे. अशीच एक अजब घटना पाकिस्तानमध्ये घडली आहे. एका नवरदेवाने आपल्या बायकोला चक्क गाढव गिफ्ट म्हणून दिला आहे. 

गाढव गिफ्ट दिल्याने पाकिस्तानच्या यूट्यूबरची जोरदार चर्चा रंगली आहे. त्याने हा व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. अजलन शाह या प्राणीप्रेमीने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टवर ही घटना शेअर केली आहे. यामध्ये त्याने आपल्या पत्नीला गाढवाचे पिल्लू भेट दिल्याचे सांगितले. वारिशा असं त्याच्या पत्नीचं नाव आहे. तुला गाढव खूप आवडतं आणि दुसरं असं की हा जगातील सर्वात गोंडस आणि मेहनती प्राणी आहे असंही अजलनने पत्नीला म्हटलं आहे. 

अजलान शाह हा पाकिस्तानच्या प्रसिद्ध यूट्यूबर आहे. त्याचे अनेक व्हिडीओ हे जोरदार व्हायरल होत असतात. त्याने काही दिवसांपूर्वी वारिशा हिच्याशी निकाह केला. त्यानंतर वेडिंग रिसेप्शनमध्ये वारिशाच्या आवडीचं गिफ्ट म्हणजे गाढव दिला आहे. अजलानने दिलेल्या माहितीनुसार, मला माहिती आहे की वारिशाला गाढव खूप जास्त आवडतं. म्हणूनच मी तिला लग्नाच्या निमित्ताने हे गिफ्ट दिलं आहे. 

अजलान शाह व्हिडिओमध्ये म्हणतो की, "आम्ही गाढवाच्या पिल्लाला त्याच्या आईपासून वेगळे केलेले नाही. तीही त्याच्यासोबत आली आहे. या दोघांना 30 हजार रुपयांना विकत घेतले होते. आता त्यांना कोणतीही मजुरी करावी लागणार नाही. ते दोघे आमच्या फार्मवर आनंदाने जगतील. माझ्या प्रमाणेच वारिशा देखील प्राणीप्रेमी आहे. म्हणूनच मी तिला हे गिफ्ट दिलं. लोक काय म्हणतील याचा मला फरक पडत नाही." एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :marriageलग्नPakistanपाकिस्तान