शहरं
Join us  
Trending Stories
1
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
2
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
3
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
4
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
5
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
6
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
7
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
8
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
9
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
10
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
11
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
12
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
13
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
15
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
16
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
17
"भाऊ एक झाले की शहराला बळ येतं...", प्रसिद्ध मराठी लेखकाची ठाकरे बंधूंसाठी पोस्ट
18
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
19
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
20
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया

बाप रे बाप! हे जगातले सर्वात महागडे बटाट्याचे चिप्स, ४ हजार रूपयात मिळतात केवळ ५ स्लाइस!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2019 16:57 IST

या कंपनीच्या बटाटा चिप्सची किंमत वाचून म्हणाल अरे बाप रे बाप....

बटाट्याच्या वेफर्स किंमत असून असून किती असेल? २० रूपये किंवा ३० रूपये...बटाट्याचे वेफर्स हे आजच्या तारखेत सर्वात जास्त विकलं जाणारं प्रॉडक्ट आहे. देशात कितीतरी ब्रॅन्ड्सचे वेफर्स मिळतात. सगळ्यांचं दुकान चांगलं सुरू आहे. पण काय तुम्हाला माहीत आहे की, जगातल्या सर्वात महागड्या बटाट्याच्या चिप्सची किंमत किती आहे?

स्वीडनची कंपनी सेंट एरिक्स ब्रुवरी. जगातले सर्वात महागडे बटाट्याचे चिप्स बनवण्यात या कंपनीचं नाव येतं. खास बाब ही आहे की, या चिप्सच्या पॅकेटमध्ये केवळ ५ चिप्स येतात. तर पूर्ण पॅकेटची किंमत ५६ डॉलर म्हणजेच ३, ९९९३.६४ रूपये आहे. हिशेब केला तर एका चिप्सची किंमत ही ७८४.११ रूपये इतकी होते.

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, हे चिप्स इतके महागडे कसे? या चिप्सच्या पॅकेटची पॅकिंग एखाद्या ज्वेलरी बॉक्ससारखीच आहे. त्यात पाच चिप्ससाठी वेगवेगळे खाचे आहेत. कंपनीच्या वेबसाइटवर जाल तर पॅकिंग करतानाचे काही फोटो बघायला मिळतील. सेंट एरिक्सचे ब्रॅन्ड मॅनेजर  मार्कस फ्रियरी सांगतात की, 'आम्हाला आमच्या कंपनीच्या बीअरसोबत सर्व्ह करण्यासाठी एक खास स्नॅक्स हवं होतं. त्याच स्टेटसचं. आम्ही खूप मेहनत घेतली. जगातले सर्वात एक्सक्लूसिव्ह बटाट्याचे चिप्स तयार केले'.

या खास चिप्समध्ये पाच वेगवेगळे फ्लेवर्स आहेत. Matsutake mushrooms, Truffled seaweed, India Pale Ale wort, Crown Dill, Leksand onion, Almond potatoes from the Ammärnas region. 

कंपनीकडून सांगण्यात आले आहे की, हे चिप्स ज्या प्रकारे तयार करण्यात आले आहेत, त्या वस्तू दुर्मिळ आहे. यात असलेल्या कांद्याची प्रजाती Leksand केवळ  Leksand शहरात १८ मे ते १० ऑगस्ट दरम्यान तयार होते. हा कांदा खासप्रकारचा आहे.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेfoodअन्न