शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

बोंबला! खऱ्या प्रेमाचा पुरावा म्हणून तरूणाने प्रायव्हेट पार्टला लावलं लॉक, २ दिवसांनंतर हालत झाली खराब

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2021 14:40 IST

Man Sealed Private Part : आपल्या खऱ्या प्रेमाचा पुरावा देण्यासाठी व्यक्तीने त्याच्या प्रायव्हेट पार्टला लॉक (Man Sealed Private Part) लावण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर जे झालं ते तो आयुष्यभर विसरणार नाही.

खऱ्या प्रेमात व्यक्ती काय करेल काहीच नेम नसतो. प्रेमात लोक जीव घ्यायलाही तयार असतात आणि द्यायलाही तयार असतात. पण काही लोक प्रेमात वेडेपणाची सीमा पार करतात आणि मग तेव्हा सुरू होते मोठी समस्या. अशीच एक घटना थायलॅंडमधून (Thailand) समोर आली आहे. येथील एक व्यक्ती प्रेयसीवर वेड्यासारखा प्रेम करायचा. पण काही कारणास्तव त्याच्या प्रेयसीला त्याच्यापासून दूर जावं लागलं. यादरम्यान आपल्या खऱ्या प्रेमाचा पुरावा देण्यासाठी व्यक्तीने त्याच्या प्रायव्हेट पार्टला लॉक (Man Sealed Private Part) लावण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर जे झालं ते तो आयुष्यभर विसरणार नाही.

थायलॅंडमधील वेब पोर्टल Sanook याबाबतचं वृत्त दिलं आहे. या वेबसाईटनुसार, या व्यक्तीला प्रेयसीला दाखवायचं होतं की, तो तिच्यावर किती प्रेम करतो. त्यासाठी त्याने प्रेमाचा पुरावा म्हणून आपल्या प्रायव्हेट पार्टवर लॉक लावून घेतलं होतं. प्रेयसी सोबत नसताना त्याचं लक्ष दुसऱ्या एखाद्या महिलेकडे जाऊ नये म्हणून त्याने असं केलं होतं. किंवा प्रेयसीच्या मनात कोणत्या प्रकारचा संशय येऊ नये हेही त्यामागचं एक कारण होतं. 

या व्यक्तीच्या आईने याबाबत सांगितलं की, तिला ज्या दिवशी याबाबत कळालं त्याच्या ठीक दोन दिवसांआधी मुलाची प्रेयसी घरी येऊन गेली होती. ती तिच्या शिक्षणासाठी दुसऱ्या शहरात जात होती. त्यामुळे तिचा मुलगा चिंतेत होता आणि त्याल्या त्याच्या प्रेयसीला त्याच्या प्रेमाचा विश्वास द्यायचा होता. त्याने प्रेयसीसमोरच त्याच्या प्रायव्हेट पार्टला लॉक लावलं.

दोन दिवसांनंतर त्याच्या रूममधून आई वेदनेने ओरडल्याचा आवाज ऐकू आला. जेव्हा आईने त्याच्या रूममध्ये जाऊन पाहिलं तर तो वेदनेने तडपत होता. आईने लगेच मुलाला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. तिथे डॉक्टरांना दिसलं की, व्यक्ती प्रायव्हेट पार्ट पूर्णपणे सुजला आहे. ४८ तास लॉक लावून ठेवल्यामुळे त्याचा प्रायव्हेट पार्ट सुजला होता. मग डॉक्टरांनी लॉकची चावी मागवली आणि लॉक उघडलं. काही दिवसांसाठी व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आलं. सध्या या घटनेची चर्चा थायलॅंडमध्ये रंगली आहे. 

टॅग्स :ThailandथायलंडJara hatkeजरा हटके