शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरांनी रूग्णाच्या फुप्फुसातून काढलं 4 सेमी लांब झुरळ, पण आत गेलंच कसं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2024 13:17 IST

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही मेडिकल प्रोसेस 22 फेब्रुवारीला कोच्चिच्या अमृता हॉस्पिटलमध्ये झाली. 55 वर्षीय व्यक्तीला श्वास घेण्यास समस्या होत होती.

Kerala Cockroach In Lungs: केरळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सामान्यपणे झुरळं घरातील कानाकोपऱ्यांमध्ये फिरताना दिसतात. पण केरळच्या एका व्यक्तीच्या फुप्फुसांमध्ये झुरळ फिरताना दिसलं. डॉक्टरांनी एका रूग्णाच्या फुप्फुसांमधून 4 सेंटीमीटर लांब एक झुरळ काढलं. रूग्णाला श्वास घेण्यास समस्या होत होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही मेडिकल प्रोसेस 22 फेब्रुवारीला कोच्चिच्या अमृता हॉस्पिटलमध्ये झाली. 55 वर्षीय व्यक्तीला श्वास घेण्यास समस्या होत होती. ज्यानंतर तो डॉक्टरांकडे गेला. टेस्ट केल्यावर डॉक्टरांना त्याच्या फुप्फुसांमध्ये एक झुरळ आढळलं.

डॉक्टर टिंकू जोसेफ यांच्या नेतृत्वात डॉक्टरांच्या टीमने रूग्णाचं ऑपरेशन केलं आणि झुरळ बाहेर काढलं. रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आलं की, झुरळ आतंच सडू लागलं होतं, ज्यामुळे रूग्णाची श्वास घेण्याची समस्या वाढली होती. रूग्णाच्या शरीरातून झुरळ काढण्यासाठी डॉक्टरांना 8 तासांचा वेळ लागला. रूग्णाला आधीच श्वास घेण्याची समस्या होती. ज्यामुळे ऑपरेशन फार अवघड झालं. मीडिया रिपोर्टनुसार, झुरळ रूग्णाच्या घशाच्या मागच्या भागात रूग्णाच्या आधीच्या उपचारासाठी लावण्यात आलेल्या नळीमध्ये पोहोचला होता. डॉक्टर जोसेफ यांनी सांगितलं रूग्ण पूर्णपणे बरा झाला आहे. त्याला घरी पाठवण्यात आलं आहे.आधीही झाल्या अशा घटना

दरम्यान, अशीच एक घटना दिल्लीच्या एका हॉस्पिटलमधून समोर आली होती. इथे डॉक्टरांच्या टीमने 26 वर्षीय एका तरूणाच्या पोटातून 38 नाणी आणि 37 चुंबक काढले होते. या तरूणाला 20 दिवसांपासून पोटदुखी आणि उलटीची समस्या होत होती. ऑपरेशन श्री गंगा राम हॉस्पिटलमध्ये झालं. रिपोर्ट्सनुसार, या व्यक्तीने शरीरात झिंक वाढवण्यासाठी नाणी आणि चुंबक गिळले होते. कारण त्याला वाटत होतं की, याने त्याला बॉडीबिल्डींगमध्ये मदत मिळेल. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल