शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

अरे बापरे! विचित्र आजारामुळे 180 डिग्रीमध्ये वळते या मुलीची मान  

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2017 20:06 IST

अनेक आश्चर्यांनी आणि गुढ रहस्यांनी भरलेल्या या जगामध्ये दररोज अनेक चित्रविचित्र आजार समोर येत असतात. असे आजार झालेल्या व्यक्तींना दैनंदिन जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. असाच एक प्रकार...

कराची - अनेक आश्चर्यांनी आणि गुढ रहस्यांनी भरलेल्या या जगामध्ये दररोज अनेक चित्रविचित्र आजार समोर येत असतात. असे आजार झालेल्या व्यक्तींना दैनंदिन जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. असाच एक प्रकार पाकिस्तानमध्ये समोर आला आहे. येथील कराचीमध्ये राहणाऱ्या अफसीन क्युमबर हिला एक विचित्र आजार झाला आहे. या आजारामुळे नऊ वर्षांची अफसीन ही आपल्या शरीराचे संतुलन राखू शकत नाही. त्यामुळे तिची मान 180 डिग्रीमध्ये वळते.   डेली मेलमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार मस्क्युलर डिसऑर्डर या मांसपेशींशी संबंधित आजाराने अफशीन त्रस्त आहे. त्यामुळे अफशीन आपली मान सरळ ठेवू शकत नाही. तसेच तिला धड उभे राहता किंवा चालताही येत नाही. एवढेच नाही तर तिला जेवण्यासाठी आणि टॉयलेटमध्ये जाण्यासाठीही तिला इतरांची मदत घ्यावी लागते. तिच्या अशा विचित्र अवस्थेमुळे मुले तिच्याजवळ जाण्यासा घाबरतात. ती शाळेत जाऊ शकत नाही. अफशीन हिला सहा भाऊ बहिणी आहेत आणि तेच तिचे मित्र आहेत. अफशीन हिचे आईवजील सांगतात की, त्यांनी आपल्या मुलीला अनेक स्थानिक डॉक्टरांकडे उपचारांसाठी नेले होते. मात्र या विचित्र आजाराचा इलाज नसल्याचे या डॉक्टरांनी सांगितले. अफशीनची आई जमलीन सांगते की, अफशीनचा जन्म हा अन्य मुलांप्रमाणेच सर्वसामान्यरित्या झाला होता. तसेच सुरुवातीचे काही महिने ती अन्य सर्वसामान्य मुलांप्रमाणेच होती. मात्र  आठव्या महिन्यानंतर तिचे आयुष्य बदलले. एकदा खेळताना ती पडली आणि तिच्या मानेला दुखापत झाली.  त्यावेळी घरच्यांनी तिच्या दुखापतीकडे लक्ष दिले नाही. तसेच थोडाफार इलाज करून घेतला. मात्र अफशीन जशी मोठी होत गेली, तसा तिचा आजार वाढत गेला.अफशीनवर उपचार करण्यासाठी आपल्याकडे पुरेसे पैसे नाहीत. त्यामुळए लोकांच्या टोमण्यांकडे दुर्लक्ष करावे लागते, असे अफशीनचे वडील अल्लाह जुरियो यांनी सांगितले.  

टॅग्स :Pakistanपाकिस्तानnewsबातम्या