शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

इथे ऑफिसमध्ये डुलकी काढल्यास काहीही प्रॉब्लेम नाही उलट, केलं जातं कौतुक...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2021 16:48 IST

ऑफिसमध्ये किंवा अन्य कामांवर असणाऱ्या व्यक्ती खुर्चीत बसून डुलक्या घेताना दिसल्यास ते अत्यंत चुकीचं मानलं जातं. असं कोणी आढळल्यास त्याची तक्रार केली जाते किंवा त्या व्यक्तीवर कर्तव्यावर असताना झोपल्याबद्दल कारवाईही केली जाऊ शकते; पण तुम्हाला आश्चर्य वाटेल, की एका देशामध्ये ऑफिसमध्ये कामाच्या वेळेत डुलकी घेणं अजिबात चुकीचं मानलं जात नाही.

दुपारी जेवण झाल्यानंतर ऑफिसमध्ये काम करताना डोळ्यावर झापड येते, पेंग येऊ लागते हा सार्वत्रिक अनुभव आहे. आपल्या देशात किंवा पाश्चात्य देशांमध्येही हे आळशीपणाचं लक्षण मानलं जातं. आपण अनेकदा ऑफिसमध्ये किंवा अन्य कामांवर असणाऱ्या व्यक्ती खुर्चीत बसून डुलक्या घेताना दिसल्यास ते अत्यंत चुकीचं मानलं जातं. असं कोणी आढळल्यास त्याची तक्रार केली जाते किंवा त्या व्यक्तीवर कर्तव्यावर असताना झोपल्याबद्दल कारवाईही केली जाऊ शकते; पण तुम्हाला आश्चर्य वाटेल, की एका देशामध्ये ऑफिसमध्ये कामाच्या वेळेत डुलकी घेणं अजिबात चुकीचं मानलं जात नाही.

उलट तिथं अशी डुलकी घेण्यास परवानगी आहे आणि विशेष म्हणजे हा देश आहे जपान (Japan), ज्या देशात अत्यंत काटेकोरपणे शिस्त, नियम पाळले जातात. कामाच्या वेळेत नियमबाह्य वर्तन केल्यास, फसवेगिरी केल्यास कठोर शिक्षा केली जाते. त्याच जपानमध्ये ऑफिसमध्ये दुपारी डुलकी (Nap) घेण्याला परवानगी आहे.

रोज रात्री चांगली झोप झाली, तर आपली ऊर्जा पुढच्या दिवसासाठी टिकून राहते. झोप पूर्ण झाली नाही तर दुसऱ्या दिवशीही दिवसभर झोप येऊ लागते. अगदी ऑफिसमध्ये कामाच्या वेळेतही (office Duty Hours) झोप येते. तसंच दुपारी जेवण झाल्यानंतर डुलकी (Nap) येणं हीदेखील स्वाभाविक गोष्ट आहे; मात्र भारतासह (India) इतर काही देशांमध्ये हे अजिबात चांगलं मानलं जात नाही; पण जपानमध्ये तुम्ही ऑफिसमध्ये झोपलात (Office Nap Allowed in Japan) तर काही फरक पडत नाही.

जपानमध्ये अनेक ऑफिसेसमध्ये लोक डुलकी घेताना दिसतात. बाहेरून बघणाऱ्यांना हे विचित्र वाटतं; पण जपानमधल्या नागरिकांसाठी हे सर्वसामान्य आहे. तिथे कोणालाही त्यांच्या आजूबाजूला कोणीतरी झोपलेलं असलेलं पाहणं हे विचित्र वाटत नाही. जपानमध्ये पॉवर नॅप (Power Nap) ही संकल्पना प्रचलित आहे. त्याद्वारे ते स्वतःला उल्हसित ठेवतात. लोकांचा असा विश्वास आहे, की तुम्ही ऑफिसमध्ये मेहनत केली असल्यानं तुम्हाला थकवा आला आणि झोप लागली. त्यामुळं ऑफिसमध्ये कोणी डुलकी घेताना दिसलं तर कोणीही त्याला आक्षेप घेत नाही.

जपानमध्ये या प्रथेला इन्मुरी (Inemuri)अशी खास जपानी संज्ञा आहे. याचा अर्थ कर्तव्यावर असताना झोपणं (Sleeping during Duty Hours) असा होतो. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल, पण जपानमध्ये ही प्रथा शतकानुशतकं चालू आहे. इथं लोक केवळ ऑफिसमध्येच नव्हे तर शॉपिंग सेंटर्स, डिपार्टमेंटल स्टोअर्स, कॅफे, हॉटेल्स, रेस्टॉरंट्समध्येही झोपतात. एवढंच नव्हे, तर ते शहरातल्या फूटपाथवरही झोपू शकतात. त्यात काहीही वावगं मानलं जात नाही. उलट अशी काही मिनिटांची पॉवर नॅप घेऊन लोक अधिक ऊर्जेने, उत्साहानं काम करतात असं मानलं जातं. त्यामुळं जपानमध्ये ऑफिसमध्ये कोणी डुलकी काढताना दिसलं तर त्यात आश्चर्य मानलं जात नाही.

 

 

टॅग्स :Jara hatkeजरा हटके