शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
2
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
3
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
4
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
5
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
6
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
7
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
8
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
9
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
10
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
11
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
12
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 
13
कावडयात्रेत घुसला भरधाव ट्रक; दोन शिवभक्तांचा मृत्यू
14
उद्योगांची एक्स्प्रेस सुस्साट, प्रक्रिया सुलभ आणि वेगवान; गुंतवणूकदारांना मोठा दिलासा
15
ठाण्यात कैद्यांच्या बंदोबस्तामध्ये हलगर्जीपणा, नऊ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
16
महादेवीसाठी महाराष्ट्रात तोडीच्या सुविधा नाहीत; पेटाच्या नव्या भूमिकेवर मठाचे स्पष्टीकरण
17
जोपर्यंत टॅरिफचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत भारतासोबत व्यापार चर्चा होणार नाही - ट्रम्प
18
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
19
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
20
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 

डोळ्यातील प्रतिबिंब पाहून त्याने शोधला पॉप सिंगरच्या घराचा पत्ता, मास्टर माइंड मजनूला अटक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2019 13:25 IST

सोशल मीडियातील फोटोंमुळे गायिकेसोबत धक्कादायक घटना घडली आहे.

जपानमधील एका महिला पॉप गायिकेसोबत एक धक्कादायक घटना घडली असून पोलिसांनी याप्रकरणी एका व्यक्तीला अटक केली आहे. या व्यक्तीवर जपानी महिला पॉप स्टारचा पाठलाग करणे आणि तिच्यावर हल्ला करण्याचा आरोप आहे. धक्कादायक बाब म्हणजे या आरोपीने या स्टारचे सोशल मीडियातील फोटो खासकरून तिच्या डोळ्यातील प्रतिबिंब पाहून तिच्या घराचा पत्ता लावला होता.

सोशल मीडियावर ठेवली नजर

हिबिकी सॅतो असं या टोकियोमध्ये राहणाऱ्या व्यक्तीचं नाव असून तो २६ वर्षाचा आहे. पोलिसांनी सांगितले की, हिबिकीने पॉप स्टारच्या सोशल मीडिया पोस्ट पाहून ही माहिती मिळवली की, ती कुठे राहते. यासाठी त्याने एक अनोखी पद्धत वापरली.

रिफ्लेक्शन आणि गुगल स्ट्रीट व्ह्यूची मदत

पोलिसांनुसार, हिबिकी हा महिला गायिकेचे फोटो झूम करून तिच्या डोळ्यातील रिफ्लेक्शनची माहिती काढत होता. म्हणजे या गायिकेने जिथे फोटो काढलाय, त्याचं प्रतिबिंब तिच्या डोळ्यात बघून त्यावरून त्याने अंदाज लावला की, तिचं घर कोणत्या परिसरात आहे. त्यानंतर त्याने गुगल स्ट्रीट व्ह्यू च्या मदतीने त्या परिसरातील घरे तपासू लागला. गायिकेच्या चेहऱ्यावर पडणाऱ्या सूर्यप्रकाशाच्या अॅंगलने त्याने अंदाज लावला की, तिच्या घराची खिडकी कोणती आहे.

घरी आल्यावर केला तिच्यावर हल्ला

पोलिसांचं म्हणणं आहे की, या पॉप स्टारच्या घराचा पत्ता मिळवल्यावर हिबिकी तासन्तास तिच्या घराखाली उभा राहू लागला.  एक दिवस त्याने बस स्टॉप ते घरापर्यंत तिचा पाठलाग केला. त्यावेळी ती एका इव्हेन्टमधून घरी परतत होती. पोलिसांच्या रिपोर्टनुसार, आजूबाजूला कुणीच नसल्याचं पाहून हिबिकीने तिचा चेहरा टॉवेलने झाकला. इतकेच नाही तर अंधाराचा फायदा घेत त्याने तिच्यावर जबरदस्ती करण्याचाही प्रयत्न केला. सुदैवाने पॉप स्टार तेथून कशीबशी पळण्यात यशस्वी ठरली.

१६ दिवसांनी अटक

या घटनेमुळे गायिका चांगलीच घाबरली आहे. तिला काही जखमाही झाल्या आहेत. पोलिसांनी गायिकेच्या तक्रारीनंतर १६ दिवसांनी हिबिकीला अटक केली. हिबिकीने मान्य केलं की, त्याने तिच्यावर हल्ला केला. त्याने असंही सांगितलं की, कशाप्रकारे तिच्या डोळ्यातील रिफ्लेक्शन पाहून तिच्या घराचा पत्ता काढला.

टॅग्स :JapanजपानJara hatkeजरा हटके