शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याचे नळ सुरू करताच ४० घरांमध्ये यायची देशी दारू; तक्रारीनंतर उघडकीस आला भलताच प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2021 12:56 IST

पाण्याच्या नळांतून देशी दारू येत असल्याची तक्रार; पोलीस तपासातून वेगळीच माहिती समोर

अहमदाबाद: घरातील पाण्याचे नळ सुरू करताच त्यातून देशी दारू येत असल्याची तक्रार गुजरातच्या अहमदाबादमध्ये काही जणांनी केली. सारखेज भागात असलेल्या ४० घरांमध्ये पाण्याच्या नळातून दारू येत असल्याचा स्थानिकांचा दावा होता. या प्रकरणाची गंभीर दखल पोलिसांनी घेतली. पाण्याचे नमुने फॉरेन्सिक चाचणीसाठी पाठवण्यात आले. त्या चाचणीच्या अहवालातून वेगळाच प्रकार समोर आला. 

'घरात असलेल्या नळांमधून देशी दारू येत असल्याचा दावा स्थानिकांनी केला. नागरिकांच्या तक्रारी आल्यानं आम्ही या प्रकरणाचा तपास केला. नळातून येणाऱ्या पाण्याचे नमुने घेऊन फॉरेन्सिकसाठी पाठवण्यात आले. त्याचा अहवाल नुकताच हाती आला. मात्र त्यात दारूचा कोणताही उल्लेख नाही. पाण्यामध्ये मलपदार्थ आणि ई कोली नावाचा बॅक्टेरिया मोठ्या प्रमाणात आढळून आला आहे. हा बॅक्टेरिया आपल्या आतड्यांमध्ये असतो', अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.प्रेमाचं 'नेटवर्क' लई स्ट्राँग बुवा! फेरीवाल्याचं इंजिनिअर मुलीवर जडलं प्रेम, मग पुढं काय घडलं तुम्हीच पाहा...

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला. मात्र हा विषय महापालिकेशी संबंधित असल्यानं त्यांनी तक्रार दाखल केलेली नाही. माणसांच्या आरोग्याला धोका पोहोचवणारी कृती केल्याबद्दल गुन्हा का नोंदवण्यात आला नाही, असा प्रश्न पोलिसांना विचारण्यात आला. त्यावर ही कृती जाणूनबुजून करण्यात आलेली नाही. त्यामुळे मानवी आरोग्याला धोका पोहोचवल्याचा गुन्हा या प्रकरणात दाखल करण्यात आलेला नाही. महापालिकेचे कर्मचारी गटार दुरुस्त करत असताना त्यातील अस्वच्छ पाणी पिण्याच्या पाण्याच्या पाईपमध्ये शिरलं, अशी माहिती पोलिसांनी दिली.

गेल्या महिन्याभरापासून पिण्याच्या पाण्याच्या नळातून देशी दारू येत असल्याची तक्रार सारखेजमधील ४० घरांमधील लोकांनी केली होती. गेल्या गुरुवारी स्थानिकांनी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला. परिसरात असलेल्या काही घरांमध्ये देशी दारू तयार करण्याचं काम चालतं. तिथले लोक नको असलेली दारू पाण्यात सोडतात. ती पिण्याच्या पाण्याच्या पाईपमध्ये शिरत असल्याचा स्थानिकांचा दावा होता.