शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अरे व्वा! "मूड नसेल तर ऑफिसला येऊ नका", 'ही' कंपनी कर्मचाऱ्यांना देतेय Unhappy leave

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2024 16:02 IST

कंपनीने कर्मचाऱ्यांना चांगलं वर्क लाईफ देण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी त्यांनी Unhappy leave ची सुरुवात केली आहे.

नोकरी करणाऱ्यांना अनेकदा विविध समस्यांचा सामना करावा लागतो. तुमच्या वैयक्तिक आयुष्यात कितीही समस्या येत असल्या तरी तुम्हाला ऑफिसमध्ये पोहोचून फोकस करून काम करावं लागतं. म्हणजेच कोणतीही कौटुंबिक समस्या असो, कुणाशी भांडण असो किंवा निराश असाल, त्याचा तुमच्या ऑफिसच्या कामावर परिणाम होऊ नये, हे कंपनीला तुमच्याकडून अपेक्षित असतं. याच दरम्यान चीनच्या एका कंपनीच्या मालकाचं विधान अतिशय खास आणि वेगळं आहे.

चीनमधील एका कंपनीने कर्मचाऱ्यांना चांगलं वर्क लाईफ देण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी त्यांनी Unhappy leave ची सुरुवात केली आहे. मार्चच्या शेवटी 2024 च्या चायना सुपरमार्केट वीकदरम्यान मध्य चीनच्या हेनान प्रांतातील रिटेल चेन, पेंग डोंग लाईचे संस्थापक आणि अध्यक्ष यू डोंगलाई यांनी ही मोठी घोषणा केली. कर्मचाऱ्यांचा मूड ठीक नसल्यास ते दहा दिवसांची सुट्टी घेण्यासाठी पात्र असतील असं म्हटलं आहे. 

प्रत्येक स्टाफ मेंबरला स्वातंत्र्य मिळावं अशी माझी इच्छा आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात एक वेळ अशी असते जेव्हा तो आनंदी नसतो. त्यामुळे जर तुम्ही खूश नसाल तर कामावर येऊ नका. कर्मचाऱ्यांना त्यांचा आरामाचा वेळ ठरवण्याचं स्वातंत्र्य हवं. त्यांना पुरेसा आराम मिळायला हवा. मॅनेजमेंटकडून ही सुट्टी नाकारली जाणार नाही असं यू डोंगलाई यांनी म्हटलं आहे. 

Unhappy leave या कल्पनेला सोशल मीडियावर खूप सपोर्ट मिळत आहे. Weibo वर एका व्यक्तीने सांगितलं की, एवढा चांगला बॉस आणि या कंपनीच्या संस्कृतीचा देशभर प्रचार व्हायला हवा. मला या कंपनीत काम करायचं आहे. मला वाटतं की मला तेथे आनंद आणि आदर मिळेल असं दुसऱ्याने म्हटलं आहे. चीनमधील कामाच्या ठिकाण असलेल्या चिंतेबाबत 2021 च्या सर्वेक्षणानुसार, 65 टक्क्यांहून अधिक कर्मचारी कामावर थकलेले आणि दु:खी असतात. Unhappy leave ची सध्या सर्वत्रच जोरदार चर्चा रंगली आहे.  

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल