शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! भावी पत्नीची हत्या करून मृतदेहासोबत पादरीनं लग्न केलं; कोर्टानं शिक्षेशिवाय सोडलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2021 15:59 IST

पाद्रीनं केली होणाऱ्या पत्नीची हत्या; गेल्याच वर्षी झाला होता साखरपुडा

नायजेरियात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका पाद्रीनं त्याच्या होणाऱ्या पत्नीची हत्या करून तिच्या मृतदेहाशी विवाह केला. या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यात पाद्रीनं कबर खोदून त्यात असलेला मृतदेह बाहेर काढून त्यासोबत लग्न करताना दिसत आहे. लग्न करून झाल्यानंतर पाद्रीनं मृतदेह पुन्हा पुरून टाकला. हा प्रकार पाहून सगळेच चक्रावले.

भावी पत्नीची हत्या करून मग तिच्या मृतदेहासोबत लग्न करणाऱ्या पादरीचं नाव डॉ. सक्सेस एमेका संडे असं आहे. गेल्या ५ वर्षांपासून तो चिओमा ओकेएला डेट करत होता. गेल्याच वर्षी दोघांचा साखरपुडा झाला. होणारी पत्नी गर्भवती असल्याचं फेब्रुवारीत डॉ. सक्सेस संडेला समजलं. लग्नाआधीच चिओमा गर्भवती असल्याचं समजताच संडे घाबरला. प्रतिमेला धक्का बसेल अशी भीती त्याच्या मनात होती. त्यामुळे संडेनं तिला डॉक्टरकडे नेलं नाही. त्यानं चिओमाला गर्भपाताच्या गोळ्या खायला दिल्या. त्यामुळे तिचा मृत्यू झाला. डॉ. सक्सेस संडेला परिसरात बराच चर्चेत असतो. लवकर मूल नको असल्यानं त्यानं चिओमाला बोलावून तिला बेशुद्ध करण्यासाठी औषध दिलं. त्यानंतर तिचा गर्भपात केला. मात्र या प्रक्रियेदरम्यान गुंतागुंत झाली. त्यामुळे चिओमाचा मृत्यू झाला. संडेनं गर्भपाताची गोष्ट सगळ्यांपासून लपवली. मात्र शवविच्छेदन अहवालातून ही माहिती उघड झाली.

गर्भपाताची बाब समजताच चिओमाचे कुटुंबीय संतापले. संडेनं चिओमाच्या मृतदेहाशी विवाह करण्याची मागणी त्यांनी केली. त्यासाठी त्यांनी दबाव टाकण्यास सुरुवात केली. डॉ. संडेनं त्यांची मागणी मान्य केली. त्यामुळे चिओमाच्या कुटुंबानं संडेला माफ केलं. त्यामुळे पाद्रीला तुरुंगवास झाला नाही. कोर्टानं त्याची निर्दोष मुक्तता केली. तो आताही चर्चमध्ये प्रार्थनेसाठी, शाळेत शिकवायला जातो.