शहरं
Join us  
Trending Stories
1
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
2
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
3
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
4
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
5
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
6
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
7
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
8
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
9
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
10
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
11
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
12
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
13
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
14
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
15
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
16
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
17
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
18
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
19
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
20
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

डरना मना हैं! भारतातील एक असं रहस्यमय सरोवर, ज्यात शेकडो मानवी सांगाडे तरंगतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2021 11:13 IST

या सरोवराच्या चारही बाजून मानवी हाडे आणि खोपड्यांचा खच पडला आहे. पण असं झालं कसं? या सरोवरात इतके सांगाडे आले कुठून? चला जाणून घेऊ रूपकुंडाचं रहस्य....

भारतात एक सरोवर आहे जे हळूहळू बर्फ वितळण्यासोबत आपल्या आत लपलेलं रहस्य बाहेर काढतं. या सरोवरात शेकडो मानवी सांगाडे आहेत. याचा नजारा सुंदर नाहीत भीतीदायक आहे. कारण या सरोवराच्या चारही बाजून मानवी हाडे आणि खोपड्यांचा खच पडला आहे. पण असं झालं कसं? या सरोवरात इतके सांगाडे आले कुठून? चला जाणून घेऊ रूपकुंडाचं रहस्य....यामागे अनेक थेअरी आहेत. अनेक कथा आहेत.

१९४२ मध्ये सापडलं हे सरोवर

या सरोवराचा शोध सर्वातआधी १९४२ मध्ये लागला होता. नंदा देवी गेम रिजर्वचे रेंजर एच.के.माधवल यांनी हे सरोवर शोधलं होतं. त्यानंतर नॅशलन जिओग्राफीने इथे एक टीम पाठवली होती आणि यातून ३० सांगाडे शोधून काढले होते. यानंतर इथे शेकडो सांगाडे सापडले आहेत. प्रत्येक लिंग आणि वयासोबतच इथे काही दागिने, चामड्याच्या चपला, बांगड्या, नखे, केस, मांस इत्यादींचेही अवशेष सापडले आहेत.

अनेक कथा आहे प्रचलित

या सरोवराबाबत अनेक कथा सांगितल्या जातात. त्यातील एका कथेनुसार, हे सांगाडे काश्मीरचा जनरल जोरावर सिंह आणि त्याच्या माणसांचे आहेत. असे म्हटले जाते की, १८४१ मध्ये जेव्हा तो तिबेट युद्धाहून परतत होता तेव्हा हिमालय क्षेत्रात रस्ता चुकला होता. यादरम्यान वातावरणही खराब झालं होतं. तो तिथे फसला आणि बर्फवृष्टीमुळे तिथेच मरण पावला.

एका दुसऱ्या कथेनुसार, हे सांगाडे भारतात प्रवेश करण्याच्या प्रयत्नात असलेल्या जपानी सैनिकांचे आहेत. यावर रिसर्चही करण्यात आला. पण त्यातून समोर आले की, ही हाडे जपानी लोकांचे नाहीत. असेही सांगण्यात आले की, हे शेकडो वर्ष जुने सांगाडे आहेत.

धार्मिक कथाही आहेत

स्थानिक लोकांनुसार, कन्नोजचा राजा जसधवल आपली गर्भवती पत्नी राणी बलाम्पासोबत इथे तीर्थयात्रेवर निघाला होता. तो हिमालयात असलेल्या नंदा देवी मंदिरात मातेचं दर्शन घेण्यासाठी जात होता. असे सांगितले जाते की, राजाने दिखावा करत यात्रा केली. ज्यात ढोलही होते. लोकांनी त्याला असं करण्यास मनाई केली होती. पण त्याने ऐकलं नाही. असं केल्याने देवी नाराज होईल असंही त्याला सांगितलं. झालंही तसंच भयानक बर्फाचे मोठाले गोळे पडले आणि वादळ आलं. त्यामुळे राजा राणी सहीत सगळे लोक सरोवरात सामावले. पण याचे काहीही ठोस पुरावे सापडले नाहीत.

आश्चर्याची बाब म्हणजे अनेक सांगाड्यांच्या डोक्यावर फ्रॅक्चरही आहेत. एका रिसर्चमध्ये असंही सांगण्यात आलं की, इथे ट्रेकर्सचा ग्रुप आला होता आणि अचानक वादळ आलं. असे म्हटले जाते की, बॉल इतक्या मोठ्या आकाराच्या गारा पडल्या होत्या. यातून कुणीही वाचू शकलं नाही कारण ३५ किलोमीटरपर्यंत कुठेही लपण्यासाठी जागा नव्हती. हे लोक सगळे लोक इथेच मरण पावले.

जेव्हा या सांगाड्यांचे एक्स-रे काढले तेव्हा यात फ्रॅक्चर असल्याचे समजले. हेच कारण होतं की, गारा पडल्याची थेअरी दिली गेली होती.

उलगडलं सांगाड्यांचं रहस्य

वैज्ञानिकांनुसार, या सरोवरात जवळपास २०० मानवी सांगाडे सापडले आहेत. जे ९व्या शतकातील भारतीय आदिवासी लोकांचे आहेत. असेही सांगण्यात आले की, यांचा मृत्यू भीषण गारांमुळे झाला होता. मात्र, आता वैज्ञानिकांना दुसऱ्या रिसर्चमध्ये आढळून आलं की हे सांगाडे दोन ग्रुपचे आहेत. यातील एका ग्रुपमध्ये एकाच परिवारातील सदस्य आहे. तर दुसऱ्या ग्रुपमधील लोक वेगळे आहेत आणि त्यांची उंची कमी आहे.

त्यासोबतच वैज्ञानिकांनी असे म्हटले की, सर्वांचा मृत्यू कोणत्याही लढाई किंवा हत्याराने झाला नाही. तर ते सर्व भीषण गारांमुळे डोक्याला मार लागल्याने मरण पावले आहेत. या गारांचा आकार खूप जास्त होता. एकंदर काय तर हे सरोवर आजही लोकांच्या मनात आकर्षण निर्माण करते. यासंबंधी कथा लोकांना आपल्याकडे आकर्षित करतात.

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटकेhistoryइतिहास