शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

केरळच्या या गावात आहेत ४०० पेक्षा अधिक जुळी मुले, रहस्य उलगडण्यात वैज्ञानिकही हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2021 17:10 IST

हे ठिकाण भारतातील केरळ राज्याच्या मलप्पुरम जिल्ह्याच्या कोडिन्ही गावात आहे. या गावाच्या वेगळेपणाची चर्चा परदेशातही केली जात आहे.

जगभरात अनेक अजब घटना घडत असतात. ज्या देश-विदेशातही चर्चेत असतात. या घटना इतक्या अनोख्या असतात की, त्यांवर सहजासहजी विश्वास बसत नाही. अशीच एक अनोखी घटना आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. एक असं ठिकाण आहे जिथे जास्तीत जास्त जुळी मुले जन्माला येतात.

हे ठिकाण भारतातील केरळ राज्याच्या मलप्पुरम जिल्ह्याच्या कोडिन्ही गावात आहे. या गावाच्या वेगळेपणाची चर्चा परदेशातही केली जात आहे. अनेकदा या गावातील जुळ्या मुलांना बघण्यासाठी दुरदुरून लोक येतात. गावात जास्तीत जास्त परिवारात जुळे मुलेच जन्माला येतात. पण असं कसं होतं? याचा शोध घेण्यासाठी अनेकदा वैज्ञानिकांच्या टीम या गावात आल्या. पण ते यावरून पडदा उठवू शकले नाहीत. (हे पण वाचा : ऑपरेशन थिएटरमध्ये 'थिएटर' शब्दाचा वापर का केला जातो? जाणून घ्या कारण....)

येथील स्थानिक लोकांचं मत आहे की, या गावावर देवाची विशेष कृपा आहे. ज्यामुळे जास्तीत जास्त मुलं जुळी जन्माला येतात. गेल्या ५० वर्षात या गावात साधारण ३०० पेक्षाही जास्त जुळ्या बाळांनी जन्म घेतला. ज्याची चर्चा आजही देश-विदेशात होते. (हे पण वाचा : बाबो! या मिशा असलेल्या राजकुमारीच्या प्रेमात पडून १३ तरूणांनी केली होती आत्महत्या)

जर तुम्ही कोडिन्ही गावात गेलात तर तुम्ही भेट मोठ्या प्रमाणात जुळ्या लोकांशी होते. काही अंदाजांनुसार या गावात साधारण ४०० जुळे लोक राहतात. या रहस्यमय गोष्टीवरून पडदा उठवण्यासाठी २०१६ मध्ये या गावात एक टीम आली होती. त्यांनी गावातील जुळ्या लोकांचे सॅम्पल्स घेतले.

पण रिसर्चमधूनही ठोस असा काही निष्कर्ष निघाला नाही. अनेक लोक म्हणाले की, या गावाच्या हवा-पाण्यात असं काही असेल ज्यामुळे इथे जास्त जुळी मुलं जन्माला येतात. 

इतकंच नाही तर काही वैज्ञानिकांनी इथे राहणाऱ्या लोकांच्या खाण्या-पिण्याचा आणि राहणीमानाचाही अभ्यास केला. त्यानंतरही त्यांच्या हाती काही लागलं नाही. गावात इतके जुळे मुलं का जन्माला येतात हे आजही रहस्य बनून आहे. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सKeralaकेरळ