शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Muthappan Temple : 'या' मंदिराची अनोखी परंपरा; इथे होतं पाळीव कुत्र्याच नामकरण, जाणून घ्या कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2023 16:15 IST

Muthappan Temple : केरळमध्ये एक अनोखे मंदिर असून, इथं पाळीव कुत्र्यांचे बारसं केलं जातं.

Muthappan Temple : भारत विविधतेने नटलेला देश असून, इथे अनेक प्रकारच्या प्रथा पाळल्या जातात. भारतातील अनेक मंदिरातही विविध प्रकारच्या प्रथेंचे पालन होते. भारताच्या दक्षिणेकडील केरळ राज्यात अशीच एक अनोख्या प्रथेचे पालन केले जाते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, केरळच्या कन्नूर जिल्ह्यात एक मंदिर आहे, जिथे लोक त्यांच्या कुत्र्यांना घेऊन येतात आणि त्यांचे नामकरण करतात.

केरळमध्ये आहे मुथप्पन मंदिर कन्नूरमधील तालिपरंबापासून सुमारे 10 किलोमीटर अंतरावर वलपट्टनम नदीच्या काठावर एक मंदिर आहे. या मंदिराचे नाव मुथप्पन मंदिर असल्याचे येथील स्थानिक लोक सांगतात. असे म्हणतात की येथे लोक आपली पाळीव कुत्रे आणतात आणि त्यांचे नामकरण करतात. तिरुवप्पन वेल्लाट्टम परंपरेत येथे कुत्र्यांची नावे ठेवण्यात आली आहेत. याबाबतची अधिक माहिती येथील मंदिर प्रशासनाच्या अधिकाऱ्याने दिली. याठिकाणी कुत्र्यांचा नामकरण सोहळा आयोजित केला जातो. यासाठी कोणतेही शुल्क किंवा पावतीची आवश्यकता नाही.

पाळीव कुत्र्यांची नावे ठेवताततिरुवप्पन वेल्लाट्टम परंपरेदरम्यान, कोणीही आपल्या पाळीव कुत्र्याला या मंदिरात आणू शकतो आणि आशीर्वाद घेऊ शकतो. स्थानिक लोक सांगतात की शनिवार आणि रविवारी येथे खूप गर्दी असते. इथल्या पुजाऱ्याला मुथप्पन थेय्यम म्हणतात आणि नामकरण करताना तो कुत्र्याच्या कानात काहीतरी कुजबुजतो आणि शेवटी त्याला प्रसाद खायला घालतो. असे केल्यावर यम पाळीव प्राण्याला त्याच्या मालकाच्या स्वाधीन करतो.

भक्त ताडी आणि तळलेले मासे अर्पण करतातमुथप्पन हा गरीब आणि कष्टकरी जनतेचा देव मानला जातो. भगवान मुथप्पनला ताडी आणि तळलेले मासे अर्पण केले जातात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुत्र्यांना मुथप्पनचे साथीदार मानले जाते. त्यामुळे या मंदिरात कुत्र्यांचीही पूजा केली जाते. स्थानिक लोक भगवान मुथप्पन यांना धर्मनिरपेक्ष देवता मानतात.

टॅग्स :Keralaकेरळdogकुत्राJara hatkeजरा हटके