शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

सलाम! पदयात्रेदरम्यान तब्येत बिघडली; ५८ वर्षीय महिलेला पाठीवर घेऊन ६ किमी पायी चालला जवान

By manali.bagul | Updated: December 24, 2020 18:50 IST

Trending News in Marathi : या मुस्लिम जवानानं हिंदू महिलेला आपल्या पाठीवर बसवून ६ किलोमीटरचा रस्ता पार केला आहे. या महिलेला तिरूमाला मंदिरात भगवान वेंकटेश्वराची पुजा करण्यासाठी येता यावं यासाठी जवानाने मदतीचा हात दिला आहे. 

जवानांच्या शौर्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर एका जवानाचा फोटो व्हायरल होत आहे. आंध्रप्रदेशातील तिरूमालामध्ये  हिंदू-मुस्लिम समानतेचे दर्शन घडवणारं उदाहरण दिसून आलं आहे. या मुस्लिम जवानानं हिंदू महिलेला आपल्या पाठीवर बसवून ६ किलोमीटरचा रस्ता पार केला आहे. या महिलेला तिरूमाला मंदिरात भगवान वेंकटेश्वराची पुजा करण्यासाठी येता यावं यासाठी जवानाने मदतीचा हात दिला आहे. 

५८ वर्षीय महिला मंगी नागेश्वरम्ना तिरूमाला मंदिराच्या दोन दिवसीय धार्मिक यात्रेसाठी निघाली होती. ही पदयात्रा असल्यामुळे रस्त्यात या महिलेची तब्येत खराब झाली. त्यांच्याकडून चाललं सुद्धा जात नव्हतं. पर्वतांवर असलेले तिरूमाला मंदिर फक्त  ६ किलोमीटर दूर अंतरावर होते. मंगी नागेश्वरम्मा  नंदलूर मंड ते तिरूमाला मंदिरासाठी पायी निघाल्या होत्या. २२ डिसेंबरला दुपारी त्यांना यात्रेदरम्यान उच्च रक्तदाबाच्या समस्येचा सामना करावा लागला. याला म्हणतात इच्छाशक्ती! ६२ वर्षांच्या आजी २३० किमी ड्रायविंग करत सिंघू बॉर्डरवर पोहचल्या

यादरम्यान कडप्पा जिल्ह्यातील पोलिस जवान या तीर्थयात्रेच्या बंदोबस्तासाठी उपस्थित होते. तेव्हा कॉन्स्टेबल शेख अरशद यांचे लक्ष नागेश्वरम्मा यांच्याकडे गेलं.  कॉन्सटेबल शेख अरशद सगळ्यात आधी नागेश्वरम्मा यांना रुग्णालयात घेऊन गेले. त्यानंतर त्यांनी ६ किलोमीटरपर्यंत आपल्या पाठीवर बसवून त्यांना मंदिरापर्यंत नेलं. यादरम्यान इतर कॉन्स्टेबलसुद्धा वयस्कर माणसांना आपल्या खाद्यावर उचलून मंदिरापर्यंत पोहोचवत होते. शाब्बास! पुण्याच्या २ शाळकरी पोरींनी केली कमाल; मंगळ आणि गुरूच्यामध्ये शोधले ६ लहान ग्रह

कॉन्सटेबल शेख अरशद यांच्या कामाचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे. त्याचे वरिष्ठ आणि तिरूमाला मंदिरात येणारे भाविकसुद्धा या जवानाच्या कामाने प्रभावित होऊन कौतुक करत आहेत. त्यांची ही कामगिरी संपूर्ण आंध्र प्रदेशात चर्चेचा विषय बनली आहे.  

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके