नवी दिल्ली : आर्थिक घडामोडींचे केंद्र असलेली मुंबई देशात इंटरनेट वापरणाऱ्यांच्या दृष्टीनेही आघाडीवर आहे. मुंबईत १.६४ कोटी इंटरनेट वापरकर्ते आहेत. देशभरात ही संख्या २४.३ कोटींहून अधिक आहे.इंटरनेट अॅण्ड मोबाईल असोसिएशन आॅफ इंडिया अर्थात आयएएमएआय व आयएमआरबी यांनी केलेल्या संयुक्त अभ्यासातून हा निष्कर्ष आला आहे. यंदा आॅक्टोबरमध्ये १.६४ कोटी मुंबईकर इंटरनेटचा वापर करत होते. गेल्यावर्षी ही संख्या १.२ कोटी होती.राजधानी दिल्लीत इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या १.२१ कोटी एवढी नोंदली गेली आहे. इंटरनेट वापरकर्त्यांच्या संख्येत वाढीच्या दृष्टीने देशातील प्रमुख आठ शहरांमध्ये दिल्ली प्रथम स्थानी आहे. येथे वापरकर्त्यांची संख्या वर्षभरातच ५० टक्क्यांनी वधारली आहे. या यादीत दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर असून कोलकाता ६.२७ कोटी वापरकर्त्यांसह तिसऱ्या स्थानी आहे. या अभ्यासात मुंबई, दिल्ली, कोलकाता, बंगळुरू, चेन्नई, हैद्राबाद, अहमदाबाद व पुणे या शहरांचा समावेश करण्यात आला.आठ शहरांमध्ये ५८ कोटी इंटरनेट वापरकर्ते आहेत. यापैकी प्रमुख चार महानगरांत २३ टक्के इंटरनेट वापरकर्ते आहेत. अन्य चार शहरांत ११ टक्के वापरकर्ते आहेत. दुसरीकडे सुरत, नागपूर, लखनऊ आणि बडोदा या शहरांत ११ कोटी इंटरनेटधारक आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)
इंटरनेट वापरणा-यांत मुंबईकर आघाडीवर
By admin | Updated: November 5, 2014 03:42 IST