शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

२३ व्या वर्षी 'ती' आहे ११ बाळांची आई; आता तिला शतक करण्याची घाई 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2021 16:48 IST

जॉर्जियातल्या महिलेला मुलांची अतिशय आवड; सरोगसीच्या माध्यमातून व्हायचंय १०० मुलांची आई;

नवविवाहित जोडप्याला अष्टपुत्र सौभाग्यवती भव असा आशीर्वाद आपल्याकडे दिला जातो. पण सध्याची एकंदर महागाई आणि इतर परिस्थितीचा विचार करून बरेच जण एक किंवा दोन अपत्यं झाल्यानंतर थांबण्याचा विचार करतात. पण जॉर्जियात वास्तव्यास असलेल्या एका महिलेला किमान १०० मुलं हवी आहेत. क्रिस्टियाना ओझ्तुर्क असं या महिलेचं नाव असून ती मूळची रशियाची आहे. सध्या क्रिस्टियानाला ११ मुलं असून तिचं वय २३ वर्षे आहे.काय सांगता? 'या' पेट्रोलपंपावर मोफत पेट्रोल मिळणार; फक्त मुलांना म्हणावे लागणार १० श्लोक

क्रिस्टियानाला लहान मुलं अतिशय आवडतात. तिचा ५६ वर्षीय पती गॅलिप ओझ्तुर्कलादेखील लहान मुलांची अतिशय आवड आहे. त्यामुळे सरोगसीच्या माध्यमातून आणखी १०० मुलं जन्माला घालण्याचा ओझ्तुर्क दाम्पत्याचा विचार आहे. यासाठी त्यांना जवळपास ८ लाख युरो खर्च करावे लागतील. इतके पैसे खर्च करण्याची ओझ्तुर्क दाम्पत्याची तयारी आहे.देव तारी त्याला कोण मारी! मशिनमध्ये हात अडकून दोन भाग झाले; अन् डॉक्टरांनी केला असा चमत्कार
सध्या मला एकूण ११ मुलं आहेत. गेल्या महिन्याच्या शेवटीच मी अकराव्या बाळाची आई झाले, असं क्रिस्टियाना यांनी एका स्थानिक माध्यमाशी बोलताना सांगितलं. 'सहा वर्षांपूर्वी मी माझ्या सर्वात मोठ्या मुलीला जन्म दिला. त्यानंतरची सर्व मुलं आम्हाला सरोगसीच्या माध्यमातून झाली आहेत,' असं क्रिस्टियाना म्हणाल्या. कोट्यधीश असलेल्या ओझ्तुर्क दाम्पत्यानं त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर १०५ मुलांना जन्म द्यायचा असल्याची इच्छा बोलून दाखवली होती.
१०५ हा आकडा काही ठरवून सांगितलेला नाही. आम्ही नेमका आकडा निश्चित केलेला नाही. पण आम्ही फक्त ११ वर थांबणार नाही, असं क्रिस्टियाना म्हणाल्या. मूळच्या रशियाच्या असलेल्या क्रिस्टियाना सध्या जॉर्जियातल्या बतुमीत राहतात. जॉर्जियात सरोगसीच्या माध्यमातून पालक होणं कायदेशीर आहे. एका सरोगसीसाठी ८ हजार युरो इतका खर्च येतो. मॉस्कोत जन्मलेल्या क्रिस्टियाना आणि मूळचे तुर्कस्तानचे असलेल्या गॅलिप यांची भेट जॉर्जियामध्ये झाली. त्यावेळी क्रिस्टियाना यांना एक मुलगी होती. त्या एकट्याच तिचा सांभाळ करत होत्या.