शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

'ही' आहे भारतातील सगळ्यात जास्त स्टेशनवर थांबणारी रेल्वे, ५ राज्यांमधून करते प्रवास!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2024 13:31 IST

Indian Railway Interesting Facts : आज अशा एका रेल्वेबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत जी देशातील सगळ्यात जास्त स्टेशनांवर थांबणारी रेल्वे आहे.

Most Stoppage Train: भारतीय रेल्वेचं जाळं देशभरातील कानाकोपऱ्याच पसरलेलं आहे. काही रेल्वे लांब पल्ल्याचा प्रवास करतात तर काही रेल्वे कमी पल्ल्याचा. काही रेल्वे नॉनस्टॉप धावतात तर काही रेल्वे जवळपास सगळ्याच स्टेशनांवर थांबतात. आज अशा एका रेल्वेबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत जी देशातील सगळ्यात जास्त स्टेशनांवर थांबणारी रेल्वे आहे. जवळपास ३७ तासांचा प्रवास करून ही रेल्वे तब्बल १११ स्टेशनवर थांबते.  

रेल्वेने तुम्हीही अनेकदा प्रवास केला असेल. पण तुम्हालाही या रेल्वेबाबत माहीत नसेल. ही रेल्वे पश्चिम बंगालच्या हावडा ते पंजाबच्या अमृतसरपर्यंत धावते. हावडा ते अमृतसरपर्यंत लागणाऱ्या जवळपास सगळ्याच रेल्वे स्टेशनवर ही रेल्वे थांबते. जवळपास १११ रेल्वे स्टेशनवर ही रेल्वे थांबते. तर हावडा ते अमृतसरपर्यंतचा १९१० किमीचा प्रवास करण्यासाठी रेल्वेला ३७ तासांचा वेळ लागतो. 

हावडा-अमृतसर मेल जवळपास ५ राज्यांमधून प्रवास करत जाते. पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, हरयाणा आणि पंजाब अशा ५ राज्यांमधून ही मेल प्रवास करत जाते. काही मोठ्या स्टेशनवर रेल्वे थोडा जास्त वेळ तर लहान स्टेशनवर १ ते २ मिनिटांसाठीच थांबते.  

या मेलचा टाइम टेबल असा ठेवण्यात आला आहे की, जास्तीत जास्त लोक यातून प्रवास करू शकतील. हे रेल्वे हावडा स्टेशनवरून सायंकाळी ७ वाजून १५ मिनिटांनी निघते आणि तिसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजून ४० मिनिटांनी अमृतसरला पोहोचते. सगळ्यात जास्त स्टेशनवर थांबणाऱ्या या रेल्वेचं तिकिटही कमी आहे. हावडा-अमृतसर मेल स्लीपर क्लासचं तिकीट भाडे ६२५ रूपये, थर्ड एसीचे भाडे १८७० रूपये, सेकंड एसीचे भाडे २७५५ रूपये आणि फर्स्ट एसीचे भाडे ४८३५ रूपये इतकं आहे. 

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सIndian Railwayभारतीय रेल्वेJara hatkeजरा हटके