शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

मालकाच्या कबुतरांना वाचवण्यासाठी माकडाने गमावला जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2017 17:45 IST

उत्तर कोलकाताच्या काशीपूरमधील उदयवाटी येथील ही घटना आहे. कबुतरांना चोरण्यासाठी काही चोर आले होते. पण माकडाने त्यांना कबुतरांना चोरण्यापासून रोखलं. कबुतरांना वाचवण्यासाठी या माकडाने...

कोलकाता : तुम्ही इमानदार कुत्र्यांबाबत नेहमी ऐकत आलात, पण कधी तुम्ही इमानदार माकडाविषयी ऐकलंय का?  कोलकातामध्ये एक पाळीव माकड आपल्या मालकाच्या कबुतरांना वाचवण्यासाठी थेट चोरांना भिडला. यामध्ये त्या माकडाचा दुर्देवी मृत्यू झालाय. मालकाने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. उत्तर कोलकाताच्या काशीपूरमधील उदयवाटी येथील ही घटना आहे. कबुतरांना चोरण्यासाठी काही चोर आले होते. पण माकडाने त्यांना कबुतरांना चोरण्यापासून रोखलं. कबुतरांना वाचवण्यासाठी या माकडाने थेट चोरांवर हल्ला चढवला. स्वतःचा जीव जाईपर्यंत हा माकड चोरांसोबत लढत होता. माकडाने आडकाठी केल्यामुळे चोरांनी माकडाला मारहाण केली, त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी विकी नावाच्या एका व्यक्तीने काशीपूर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, मोहम्मद नसीम नावाचा एक व्यक्ती त्याच्या सहका-यांसह कबुतरांना चोरी करण्यासाठी आला. यापूर्वीही नसीमने कबुतरांना चोरण्याचा प्रयत्न केला होता असं विकीने तक्रारीत म्हटलं आहे. कबुतरांना चोरण्याचा प्रय़त्न करत असताना माकडाने आरोपींवर हल्ला केला. माकडाच्या हल्ल्यातून वाचण्यासाठी आरोपींनी माकडाच्या पायावर जबर मारहाण केली. रात्रभर रक्तस्त्राव झाल्याने माकडाचा मृत्यू झाला, असा दावा विकीने केला आहे.   

टॅग्स :Monkeyमाकडpigeonsकबुतर