शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

बौद्ध भिक्षुला रातोरात मिळाले करोडो रुपये; दान करण्यास सुरुवात, लोकांच्या लागल्या लांबच लांब रांगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2022 12:58 IST

monk wins 4 crore rupees lottery : उत्तरेकडील प्रांतातील नाखोन फानोमच्या (Nakhon Phanom) या 47 वर्षीय भिक्षुचे नाव फ्रा क्रू फनोम आहे, जे  Wat Phra That Phanom Woramahawihan नावाच्या मंदिराचे सचिव देखील आहे.

थायलंडमध्ये एका बौद्ध भिक्षुने चार कोटी रुपयांची लॉटरी जिंकली. त्यानंतर भिक्षुने हे लॉटरी जिंकलेले पैसे लोकांना दान करण्यास सुरुवात केली. भिक्षुने लॉटरीचे पैसे स्थानिक लोक, इतर मंदिरे आणि विविध संस्थांना दान करत आहेत. उत्तरेकडील प्रांतातील नाखोन फानोमच्या (Nakhon Phanom) या 47 वर्षीय भिक्षुचे नाव फ्रा क्रू फनोम आहे, जे  Wat Phra That Phanom Woramahawihan नावाच्या मंदिराचे सचिव देखील आहे.

thethaiger.com च्या मते, भिक्षुने अलीकडेच 18 मिलियन baht (4 कोटींहून अधिक) चे लॉटरी बक्षीस जिंकले आहे. भिक्षू आता लॉटरीची रक्कम दान करत आहेत. भिक्षू म्हणाले की, सहसा लॉटरीची तिकिटे खरेदी करत नाही कारण भिक्षुंनी कोणत्याही प्रकारचा जुगार खेळू नये. पण काही दिवसांपूर्वी त्यांनी एका स्थानिक दुकानदाराच्या मदतीसाठी लॉटरीचे तिकीट घेतले होते. कोरोना महामारीच्या काळात दुकानदार आर्थिक संकटात सापडला होता.

भिक्षूचे म्हणणे आहे की, जिंकलेले पैसे देवदूतांचे आहेत आणि त्यामुळे त्यांना ते स्वतःसाठी ठेवायचे नव्हते. त्यामुळे लॉटरीत जिंकलेले पैसे इतरांना वाटून देण्याचा निर्णय घेतला. यानंतर त्यांनी हजारो स्थानिक लोकांना 200-200  baht (500-550 रुपये) दान करण्यास सुरुवात केली. रिपोर्टनुसार, पैसे देण्याच्या घोषणेनंतर भिक्षुंजवळ लोकांची रांग लागली होती. हजारो लोक मंदिरात येऊ लागले. आता परिस्थिती अशी आहे की प्रांताधिकारी गर्दीवर लक्ष ठेवत आहेत आणि गर्दीत कोविड नियम पाळायलाही मिळत आहेत. भिक्षुने आतापर्यंत परिसरातील स्थानिक लोकांना एकूण 1.5 मिलियन baht (34 लाख) दान केले आहे. तसेच, त्यांचे म्हणाले की, सर्व पैसे (4 कोटी) दान स्वरूपात देईल.

भिक्षु फनोम यांनी थाई मीडियाला सांगितले की,  देवदूतांनी लॉटरी जिंकण्यासाठी आणि लोकांना मदत करण्यासाठी आशीर्वाद दिला. कारण ते 10 वर्षांपासून मंदिराची देखभाल करत आहेत. त्यांनी सांगितले की. लॉटरीच्या सोडतीच्या तीन दिवस आधी त्याने 061905 क्रमांकाची तीन लॉटरीची तिकिटे आणली होती. विक्रेत्याने स्वतः त्याला लॉटरीचे तिकीट खरेदी करण्यास मदत करण्यास सांगितले होते. दरम्यान, बौद्ध भिक्षुने लॉटरी जिंकण्याची ही पहिलीच वेळ नसली तरी वेळोवेळी थाई मीडियामध्ये भिक्षूंनी लॉटरी जिंकल्याच्या बातम्या येत आहेत. एवढी मोठी रक्कम दान केल्याबद्दल सध्या लोक या बौद्ध भिक्षुचे कौतुक करत आहेत.

टॅग्स :ThailandथायलंडJara hatkeजरा हटकेInternationalआंतरराष्ट्रीय