शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

जिगरबाज आई! आपल्या मुलाला वाचवण्यासाठी Mountain Lion सोबत आईने केली फाइट, बुक्यांचा मार खाऊन पळून गेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2021 13:45 IST

आई सिंहासमोर भिंत बनून उभी राहिली. आई सिंह हार मानत नाही तोपर्यंत त्याच्यासोबत लढत राहिली आणि आपल्या मुलाचा जीव वाचवला.

आपल्या बाळाचा जीव वाचवण्यासाठी आई आपल्या जीवाची बाजी लावण्यात मागे सरत नाही. अमेरिकेतून अशीच एक घटना समोर आली आहे. इथे एक आई आपल्या पाच वर्षीय मुलाचा जीव वाचवण्यासाठी एका खतरनाक सिंहासोबत भिडली. सिंहाने बाळावर हल्ला करत त्याला सोबत खेचत नेण्याचा प्रयत्न केला. पण आई सिंहासमोर भिंत बनून उभी राहिली. आई सिंह हार मानत नाही तोपर्यंत त्याच्यासोबत लढत राहिली आणि आपल्या मुलाचा जीव वाचवला.

'द सन'च्या रिपोर्टनुसार, ही घटना अमरिकेतील कॅलिफोर्नियातील आहे. एक मुलगा आपल्या घराबाहेर खेळत होता. Mountain Lion ने पाच वर्षीय मुलावर झेप घेतली आणि त्याला खेचत ४५ फूटापर्यंत नेलं. तेव्हाच आईने मुलाच्या ओरडण्याचा आवाज ऐकला आणि त्यानंतर जे झालं त्याचं लोकांकडून कौतुक केलं जात आहे. (हे पण वाचा : ती आई होती म्हणुनी! घरी झोपलेल्या बाळाचा गुदमरत होता श्वास, ऑफिसमध्ये बसलेल्या आईने वाचला त्याचा जीव)

आईने जेव्हा आपल्या मुलाला सिंहाच्या तोंडात पाहिलं तर तिने त्यांच्यावर झडप घेतली आणि त्याच्या तोंडावर बुक्यांनी मारा केला. त्यानंतर Mountain Lion ही चिडला आणि त्याने महिलेवर हल्ला केला. पण ती न घाबरता बुक्यांचा मारा करत राहिली. अखेर सिंहाला माघार घ्यावी लागली. तो तिथून पळून गेला. मुलाला जखमी स्थितीत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.

कॅलिफोर्निया डिपार्टमेंट ऑफ फिश अॅन्ड वाइल्ड लाइफने या घटनेबाबत माहिती देताना सांगितलं की, महिला सिंहाला तोपर्यंत मारत राहिली जोपर्यंत तो मुलाला सोडत नाही. आईच्या बहादुरीमुळे मुलाचा जीव वाचला. डिपार्टमेंटने हेही सांगितलं की, मुलगा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या डोक्यावर आणि शरीरावर गंभीर जखमा आहेत. हल्ल्यात मुलाच्या आईलाही जखमा झाल्या आहेत. त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. 

टॅग्स :AmericaअमेरिकाCaliforniaकॅलिफोर्नियाJara hatkeजरा हटके