शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

अडीच वर्षापासून बेपत्ता व्यक्तीला स्कॉर्पिओ बक्षिस मिळाली; कंपनीनं कुटुंबाला पत्र पाठवलं

By प्रविण मरगळे | Updated: December 15, 2020 11:58 IST

या पत्रात पवन कुमारला कुपन लागल्याची माहिती मिळाली त्यापेक्षा गेल्या अडीच वर्षापासून बेपत्ता मुलगा जिवंत असल्याचं समजताच आई-वडिलांना आनंद झाला.

...याला नशीब म्हणायचं की आणखी काय, जो व्यक्ती गेल्या अडीच वर्षापासून घरातून बेपत्ता होता, त्याच्या नावावर बक्षिस म्हणून महिंद्रा स्कॉर्पियो लागली आहे. बेपत्ता व्यक्तीचा ठावठिकाणा लागला नाही परंतु तो जिवंत असल्याचा पुरावा कुटुंबाला मिळाला. हिमाचल प्रदेशातील सोलन जिल्ह्यात अशीच एक घटना समोर आली आहे.

सोलन जिल्ह्यातील ग्राम पंचायत पलोगच्या नेर गावातून बेपत्ता असणाऱ्या पवन कुमार यांच्या घरी औषध कंपनीकडून एक पत्र मिळालं, हे पत्र वाचून बेपत्ता मुलाच्या आई-वडिलांना पुन्हा आस लागली आहे. पवन कुमारने एका औषध कंपनीतून औषध खरेदी केलं होतं, कंपनीकडून मिळालेल्या कुपनमध्ये पवन कुमारला महिंद्रा स्कॉर्पिओ बक्षिस म्हणून लागली.

पवन कुमार यांचे वडील नंदलाल शर्मा म्हणाले की, जवळपास अडीच  वर्षापूर्वी पवन कुमार घरात संध्याकाळी परततो असं सांगून निघून गेला तो पुन्हा कधीच परतला नाही. त्यादिवसापासून पवन कुमार घरातून बेपत्ता आहे. पवन बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली मात्र त्याचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही. काही दिवसांपूर्वी औषध कंपनीकडून पवन कुमार यांच्या घराच्या पत्त्यावर एक पत्र आलं, हे पत्र वाचून आई-वडिलांना मोठा आनंद झाला.

या पत्रात पवन कुमारला कुपन लागल्याची माहिती मिळाली त्यापेक्षा गेल्या अडीच वर्षापासून बेपत्ता मुलगा जिवंत असल्याचं समजताच आई-वडिलांना आनंद झाला. कुटुंबाने कंपनीच्या अधिकाऱ्यांची संवाद साधला, तेव्हा त्यांनी सांगितले की, पवन कुमार यांनी अडीच महिन्यांपूर्वी औषधं खरेदी केली होती. त्यावेळी मिळालेल्या कुपनमध्ये महिंद्रा स्कॉर्पिओ बक्षिस म्हणून लागली. पवन कुमार यांची कागदपत्रे जमा केल्यानंतर बक्षिस कंपनीकडून मिळणार आहे.

दरम्यान, औषध कंपनीकडून आलेल्या पत्रानंतर पवन कुमार यांचा शोध घेण्यात मदत मिळणार आहे, संबंधित घटनेचा पोलिसांनी तपास सुरु केला असून, लवकरात लवकर पवन कुमार यांचा ठावठिकाणा सापडण्यात यश मिळेल असा विश्वास जिल्ह्याचे डीएसपी प्रताप सिंह यांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :PoliceपोलिसMissingबेपत्ता होणं