शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

मिस लाँग हेअर तिच्या लांबसडक केसांनी झाकते आपलं शरीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2017 17:11 IST

लंडनमधील एका तरुणीचे केस एवढे लांब आणि घनदाट आहेत की त्याने ती तिचं संपूर्ण शरीर झाकून घेऊ शकते. 

ठळक मुद्देलांब-सडक सुंदर केस कोणाला नको असतात. मात्र एवढ्या लांब केसांची निगा राखणंही तेवढंच अवघड असतं.वयाच्या सातव्या वर्षापासून तिनं केस वाढवणं सुरु ठेवलंय. यासाठी ती नियमित केस कापतही होती. ‘या लांब केसांमुळे मी लोकांच्या कौतुकाचा आणि कुतूहलाचा विषय ठरते.’

लांब-सडक सुंदर केस कोणाला नको असतात. मात्र एवढ्या लांब केसांची निगा राखणंही तेवढंच अवघड असतं. त्यामुळे केस वाढवण्याच्या भानगडीत फार कमी स्त्रिया पडतात. पण तुम्हाला माहितेय का लंडनमधील एका तरुणीचे केस एवढे लांब आणि घनदाट आहेत की त्याने ती तिचं संपूर्ण शरीर झाकून घेऊ शकते. 

लंडनमध्ये राहणाऱ्या त्या तरुणीचं नाव आहे मॅलगोरजाता (३२). वयाच्या सातव्या वर्षापासून तिनं केस वाढवणं सुरु ठेवलंय. यासाठी ती नियमित केस कापतही होती. जेणेकरुन केसांना योग्य वाढ आणि आकार मिळेल. केसांच्या निगराणीसाठी ती घरगुती व नैसर्गिक साधनांचा वापर करते. केस धुण्याआधी डोक्याला नारळाच्या दुधाने मालिश करते आणि मग अर्ध्या तासात केस धुवून अंघोळ करते. 

केसांची ठराविक वाढ झाल्यानंतर मात्र तिने केस कापणं बंद केलं. जवळपास २०१५ पासून तिने केस कापले नसल्याचं ती सांगते. तिचे केस तब्बल सात फुट लांब असून ते तिच्या पायांच्या तळव्यांपर्यंत पोहचतात. या घनदाट केसांमुळे ती स्वतःचं संपूर्ण शरीरही झाकून घेऊ शकते. शिवाय मैलगोरजाता म्हणतात की ,‘या लांब केसांमुळे मी लोकांच्या कौतुकाचा आणि कुतूहलाचा विषय ठरते.’

तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ती नेहमी तिच्या केसांचे फोटो टाकत असते. तिच्या  अकाउंटचं नावही ‘मिस लाँग हेअर’ असं आहे. वेगवेगळ्या हेअरस्टाईल करून किंवा प्रयोग करून ती ते फोटो इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करत असते. मुळातच सुंदर असलेल्या तिला या दाट केसांमुळे चार चाँद लागले आहेत, हे काही नव्याने सांगायला नको.