शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

लिफ्टमधील आरसा चेहरा बघण्यासाठी नाहीच, खरं कारण वाचून बसणार नाही विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 16:15 IST

Why lift have mirror : पूर्वीच्या लिफ्टपेक्षा आजकालच्या लिफ्ट फार आधुनिक आहेत. आधी लिफ्ट फार हळू चालत होत्या. ज्यामुळे लोक वैतागायचे. अनेकांनी तक्रारी करण्यास सुरुवात केली होती.

Why lift have mirror : तुम्ही मॉलमध्ये किंवा एखाद्या उंच इमारतीत गेलात तर वर जाण्यासाठी लिफ्टची व्यवस्था असते. पूर्वीपेक्षा आजकाल लिफ्टचा वापर खूप जास्त वाढला आहे. जागोजागी लिफ्ट लावलेली असते. ज्यामुळे वरच्या मजल्यावर जाणं आणि खाली येणं सोपं झालं आहे. उंचच इमारतीत वर पायऱ्यांनी चढून जाणं काही शक्य नाही. अशात लिफ्ट फारच सोयीस्कर असं उपकरण आहे. तुम्ही सुद्धा लिफ्टमध्ये अनेकदा बसले असालच. यात फॅन, हॅंडल, म्युझिक, आरशे अशा अनेक सुविधाही असतात. लिफ्टमध्ये या गोष्टी फारच विचारपूर्वक ठेवल्याचं दिसतं. आरशामध्ये लोक आपला चेहरा बघतात, महिला मेकअपही करतात. पण तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, लिफ्टमध्ये आरसा असण्याचं मुख्य कारण हे नाहीच. 

आजकाल भलेही लोक लिफ्टमधील आरशात आपला चेहरा नीट आहे की नाही. केस नीट आहेत की नाही. कपडे व्यवस्थित आहेत की नाही यासाठी बघत असतील. पण लिफ्ट आरसा असण्याचं मुख्य काही फारच वेगळं आणि जरा मजेशीरही आहे. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

पूर्वीच्या लिफ्टपेक्षा आजकालच्या लिफ्ट फार आधुनिक आहेत. आधी लिफ्ट फार हळू चालत होत्या. ज्यामुळे लोक वैतागायचे. अनेकांनी तक्रारी करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे काही लिफ्ट कंपन्यांनी यावर काय उपाय करता येईल यावर विचार सुरु केला. पण हे काम महागडंही होतं. काही कंपन्यांनी वेगाने वर जाणाऱ्या आणि सुरक्षित लिफ्ट तयार करायला सुरुवातही केली. पण एका कंपनीने वेगळा विचार केला.

एका लिफ्ट कंपनीच्या इंजिनिअरने हा मुद्दा मांडला की, आपल्या लिफ्टचा स्पीड बरोबर आहे. लोकंच मुर्ख आहेत. लोक असा विचार करतात की, लिफ्ट हळुवार जाते. या एका स्टेटमेंटवर त्या कंपनीने वेगळ्या विचाराने काम सुरु केलं. या कंपनीने लिफ्टच्या वेगात बदल करण्यापेक्षा त्यातील लोकांवर लक्ष दिलं. खरंच लिफ्ट स्लो आहे का? लोक असा विचार का करतात? त्यांना लिफ्टमध्ये कसं सहज करता येईल? याचा विचार कंपनीने सुरु केला. 

लिफ्टमध्ये आरसा लावण्याचं कारण...

कंपनीच्या लक्षात आलं की, लोकांकडे लिफ्टमध्ये करण्यासाठी काहीच नसतं. फक्त भीतींकडे पाहणे आणि लिफ्ट पडणार तर नाही ना या गोष्टीचा विचार करणे, इतकेच त्यांच्या मनात सुरू असते. यातून असा विचार समोर आला की, लिफ्टमध्ये आरसा लावल्यास लोकांचं लक्ष भींतीवरुन डायव्हर्ट करता येऊ शकतं. आरसा लावल्यास ते केस नीट केले की नाही हे बघू शकतात. चेहरा बघू शकतात. महिला त्यांचं मेकअप कसं झालंय, हे बघू शकतात. 

मग काय या कंपनीने त्यांच्या लिफ्टच्या स्पीडमध्ये कोणताही बदल न करता आरसे लावण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी एक सर्व्हे केला. त्यात त्यांनी आता लिफ्टचा वेग कसा वाटतो? असा प्रश्न लोकांना विचारला. त्यावर अनेकांनी आता वेग बरोबर असल्याची उत्तरे दिली. मुळात त्या लिफ्टच्या वेगात कोणताही बदल करण्यात आला नव्हता. पण हे करण्यामागे माणसशास्त्रीय कारण होतं. 

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके