शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

लय भारी! लॉकडाऊनमधला वेळ लावला सत्कारणी; सुपारीवर तयार केल्या जबरदस्त, शानदार कलाकृती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2021 20:28 IST

Carves on Betel Nuts : लॉकडाऊनमधला रिकामा वेळ एका व्यक्तीने सत्कारणी लावून कमाल केली आहे. 

नवी दिल्ली - कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. लॉकडाऊनमुळे गेल्या काही महिन्यांपासून अनेक जण घरी बसून आहेत. अनेकांनी या रिकाम्या वेळेत नवनवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न केला. आपल्या कलागुणांना वाव दिला तसेच छंद जोपासला. सोशल मीडियाच्या माध्यमातून सातत्याने भन्नाट कल्पना आणि जबरदस्त कलाकृती समोर येत आहेत. वेगवेगळ्या गोष्टींची माहिती मिळत आहे. लॉकडाऊनमधला रिकामा वेळ एका व्यक्तीने सत्कारणी लावून कमाल केली आहे. 

तांदूळ, पेन्सिलचं टोक, नारळ यांच्यावर सुंदर कालकृती केलेल्या याआधी अनेकांनी पाहिल्या आहेत. मात्र आता छोट्याशा सुपारीवर जबरदस्त, शानदार कलाकृती तयार करण्यात आल्या आहेत. गुजरातच्या सूरतमध्ये पवन शर्मा यांनी लॉकडाऊनमध्ये सुपारीवर आपलं कौशल्य दाखवलं आहे. राम मंदिर, श्री गणेश, पंतप्रधान नरेंद्र मोदींची कलाकृती तयार केल्या आहेत. यासोबतच अगदी चहाच्या कपाच्या कलाकृतीपासून नावांपर्यंत सुपारीवर उत्कृष्ट पद्धतीने कोरीव काम केलं आहे.

पवन यांनी 2021 नव्या वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी खास सुपारीपासून हॅपी न्यू इयर तयार केलं आहे. पवन शर्मा यांनी सुपारीवर आतापर्यंत जवळपास 60 कलाकृती तयार केल्या आहेत. त्यांच्या या कलेची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. उत्कृष्ट कलाकृती पाहून सर्वांनीच भरभरून कौतुक केलं आहे. अवघ्या काही मिनिटांत पवन सुपारीवर सुंदर कलाकृती साकारतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :GujaratगुजरातJara hatkeजरा हटके