शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

लेकीच्या लग्नासाठी मंडप सजला; एक दिवस आधी बाप तिसऱ्यांदा बोहल्यावर चढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2022 10:38 IST

मुलीच्या विवाहाची तयारी सुरू असताना वडिलांनी आटपून घेतलं लग्न; तिसऱ्यांदा अडकले लग्नाच्या बेडीत

मुलीच्या लग्नाची तयारी सुरू असताना वडिलच बोहल्यावर चढल्याचा अजब प्रकार घडला आहे. लेकीच्या विवाहाची तयारी सुरू असताना वडिलांचं प्रेम प्रकरण समोर आलं. त्यामुळे एकच खळबळ उडाली. त्यानंतर गावासमोर वडिलांनी प्रेयसीसोबत विवाह केला. झारखंडच्या गढवा जिल्ह्यामध्ये हा प्रकार घडला.

मुलीच्या लग्नासाठी उभारण्यात आलेल्या मंडपामध्ये वडिलांचा विवाह संपन्न झाला. विशेष म्हणजे या व्यक्तीचे आधी दोन विवाह झाले आहेत. त्याला चार मुलंदेखील आहेत. गढवा जिल्ह्यातील लवाही कला गावात ही घटना घडली. 

५६ वर्षांच्या शिव प्रसाद वैद्य यांचं त्यांच्याच विद्यार्थिनीवर प्रेम जडलं. शिव प्रसाद गावातील एका विद्यार्थिनीची शिकवणी घ्यायचे. त्यादरम्यान दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. तीन वर्षांपूर्वी तरुणी घरातून एकाएकी बेपत्ता झाली. त्यानंतर तिच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आणि शिव प्रसाद यांच्यावर संशय व्यक्त केला. मात्र पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. 

तीन वर्षांपासून मुलीचा ठावठिकाणा लागत नव्हता. बेपत्ता तरुणी छत्तीसगडच्या एका गावात असल्याची माहिती तिच्या कुटुंबीयांना गेल्या सोमवारी मिळाली. शिव प्रसादनं तरुणीला एका भाड्याच्या खोलीत ठेवलं होतं. तरुणीच्या कुटुंबीयांनी याची माहिती ग्रामस्थ आणि पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी शिवप प्रसाद वैद्यला चौकशीसाठी बोलावलं. त्यानं सत्य कबूल केलं.

तरुणी एका मुलाची आई झाल्याचं शिव प्रसादनं सांगितलं. त्यानंतर तरुणीला छत्तीसगडला आणण्यात आलं. मंगळवारी वरात काढण्यात आली. बाबा मगरदह महादेव मंदिरात दोघांचं लग्न लावून देण्यात आलं. यावेळी पोलिसांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते.

टॅग्स :marriageलग्न