शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बायकोसोबत भांडला अन् फळफळलं नशीब; क्षणार्धात झाला करोडपती; पैशाबाबत समजताच पत्नी बेशुद्ध

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2023 15:26 IST

पत्नीसोबतच्या भांडणामुळे एका व्यक्तीचं नशीब फळफळलं आहे. त्याला क्षणार्धात कोट्यवधींची लॉटरी लागली आहे.

कोणाचं नशीब कधी, कसं आणि कुठे फळफळेल हे सांगता येत नाही. काही लोक एका रात्रीत करोडपती होतात. अशीच एक अजब घटना आता समोर आली आहे. पत्नीसोबतच्या भांडणामुळे एका व्यक्तीचं नशीब फळफळलं आहे. त्याला क्षणार्धात कोट्यवधींची लॉटरी लागली आहे. सोशल मीडियावर या घटनेची जोरदार चर्चा रंगली आहे. पत्नीशी भांडण झाल्यानंतर एक व्यक्ती घराबाहेर पडला होता आणि तेव्हाच त्याला कोट्यवधी रुपये मिळाले आहेत. 

पत्नीचा हे सर्व पाहून विश्वास बसेना. ती काही काळ बेशुद्ध पडली. metro.co.uk या वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना ऑस्ट्रेलियातील ओलोंगोंग येथील आहे. तिथे एका जोडप्याला 20 लाख डॉलर्स म्हणजेच 16 कोटी रुपयांहून अधिकची लॉटरी लागली आहे. पत्नी दर आठवड्याला लॉटरीचे तिकीट काढायची. तिला विश्वास होता की ती एक दिवस नक्कीच श्रीमंत होईल. वर्षानुवर्षे ती हे करत होती. एका आठवड्यात महिलेचा पती तिला लॉटरीचे तिकीट विकत घ्यायला विसरला.

तिकीट वरून दोघांमध्ये भांडण झाले. मग नवऱ्याने ठरवलं की पुढच्या आठवड्यात दोन तिकिटे काढायची. त्याने तेच केले. आपल्या पत्नीचे मन जिंकण्यासाठी पतीने त्याच क्रमांकासह लॉटरीची तिकिटे विकत घेतली जी त्याची पत्नी अनेक वर्षांपासून वापरत होती. एकाच दिवसात, या दोन्ही लॉटरीची तिकिटांवर एक एक मिलियन डॉलरची लॉटरी लागली. एवढी मोठी लॉटरी जिंकलेली पाहून बायको जवळजवळ बेशुद्धच झाली. महिलेच्या पतीचाही यावर विश्वास बसला नाही.

क्षणार्धात करोडपती बनलेल्या या जोडप्याने आता हे पैसे खर्च करण्यासाठी एक खास योजना आखली आहे. प्रथम ते आपल्या मुलीसाठी घर खरेदी करतील. यानंतर आपण नातवंडांसाठी काही पैसे जमा करू आणि नंतर वाचलेल्या पैशातून दोघेही सहलीला जाऊ असं ठरवलं आहे. महिला गेल्या अनेक वर्षांपासून समान क्रमांकाच्या लॉटरी खरेदी करत होती. ती जवळपास 20 वर्षांपासून लॉटरी खरेदी करत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Jara hatkeजरा हटके