शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

तीन चेहऱ्यांचा माणूस कधी पाहिलाय का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2018 12:07 IST

दोनदा चेहरा प्रत्यारोपण झालेला जगातील एकमेव माणूस

पॅरिस: जेरॉम हॅमॉन यांना आता तीन चेहऱ्यांचा माणूस अशी नवी ओळख मिळाली आहे. जेरॉम यांच्या चेहऱ्याचं दोनदा प्रत्यारोपण करण्यात आलं आहे. याआधी जगात कोणत्याही व्यक्तीच्या चेहऱ्याचं दोनदा प्रत्यारोपण करण्यात आलेलं नाही. चेहरा प्रत्यारोपणाच्या दुसऱ्या सर्जरीनंतर ते दोन महिने पॅरिसमधील रुग्णालयात होते. आता त्यांनी त्यांची नवी ओळख स्वीकारली आहे. जेरॉम हॅमॉन यांचा चेहरा आता स्थिर आहे. मात्र आताही त्यांची त्वचा एकरुप झालेली नाही. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी बराच कालावधी लागतो. याशिवाय यामध्ये औषधांची भूमिका महत्त्वाची असते. पॅरिसमधील जॉर्जेस-पॉम्पिडो युरोपियन रुग्णालयातील डॉक्टरांच्या टीमनं अभूतपूर्व कामगिरी करत एकाच व्यक्तीच्या चेहऱ्याचं दोनवेळा प्रत्यारोपण केलं. प्लास्टिक सर्जरीचे प्रोफेसर लॉरेंट लँटिरी यांनी या टीमचं नेतृत्व केलं. लॉरेंट यांनीच 2010 मध्ये जेरॉम हॅमॉन यांच्या पूर्ण चेहऱ्याचं प्रत्यारोपण केलं होतं. 

जेरॉम हॅमॉन neurofibromatosis टाईप 1 ग्रस्त आहेत. ज्यामुळे ट्युमर होतो. 2010 मध्ये हॅमॉन यांच्या चेहऱ्याचं पहिल्यांदा प्रत्यारोपण झालं. हे प्रत्यारोपण यशस्वी झालं होतं. मात्र त्याचवर्षी हॅमॉन यांना साधारण सर्दीसाठी एक अँटीबायोटिक औषधं देण्यात आलं. त्यामुळे 2016 मध्ये त्यांचा प्रत्यारोपण केलेला चेहरा बिघडू लागला. त्यामुळे त्यांचा दुसरा चेहरा खराब होऊ लागला. हा त्रास इतका वाढला की, हॅमॉन यांना गेल्या वर्षी प्रत्यारोपण केलेला चेहरा हटवावा लागला. त्यामुळे हॅमॉन काही काळ बिनचेहऱ्याचे होते. त्यावेळी हॅमॉन यांना भुवया, कान, त्वचा नव्हती. त्यांना बोलताही येत नव्हतं आणि खाताही येत नव्हतं. यानंतर जानेवारीत त्यांना डोनर मिळाला आणि मग चेहरा प्रत्यारोपण यशस्वी झालं. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटके