शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
5
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
6
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
7
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
8
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
9
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
10
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
11
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
12
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
13
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
14
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
15
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
16
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
17
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
18
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
19
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
20
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक

बोंबला! महिलेने पहिल्याच डेटला खाल्लं 11 हजार रूपायांचं लोणचं, बघतच राहिला तरूण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2023 14:28 IST

जाकिर नावाच्या व्यक्तीसोबतही असंच काहीसं झालं. त्याने टिकटॉकवर त्याच्या डेटिंगचा किस्सा सांगितला.

सध्याचा जमाना हा ऑनलाईन डेटिंगचा आहे. लोक सोशल मीडियावर अनेकांशी संवाद साधतात, एकमेकांचे फोटो बघतात आणि भेटतात. पण काही केसेसमध्ये ही ऑनलाईन डेटिंग फार घातकही ठरते. लोक एकमेकांना व्यवस्थित ओळखू शकत नाहीत आणि मग भेट झाल्यावर त्यांना काही गोष्टींचा धक्का बसतो. 

जाकिर नावाच्या व्यक्तीसोबतही असंच काहीसं झालं. त्याने टिकटॉकवर त्याच्या डेटिंगचा किस्सा सांगितला. जाकिरने व्हिडिओच्या कॅप्शनला लिहिलं होतं की, “worst date in a very long time” म्हणजे आतापर्यंतही सगळ्यात वाईट डेट. व्हिडिओ जाकिरने सांगितलं की, डेटिंग अॅप बम्बलवर मी सिडनी नावाच्या एका महिलेला भेटलो. फोनवर बरच बोलणं झाल्यावर आम्ही भेटण्याचा निर्णय घेतला. 

सगळ्यात आधी तर मला दिसलं की, ती फोटोंमध्ये दिसते तशी नव्हती. म्हणजे तिने फोटो फिल्टर केले होते. इतकंच नाही तर सिडनी खोटी बोलली होती की, तिला मुलं नाहीत. तिच्या इन्स्टावरून मला हे समजलं होतं.

जाकिरने पुढे सांगितलं की, इथपर्यंत सगळं काही ठीक होतं. पण माझं डोकं तेव्हा खराब झालं तेव्हा आम्ही रेस्टॉरंटमध्ये जेवण मागवलं. इथे जेवणासोबत तिने एकूण 53 फ्राइड पिकल खाल्ले. वेटर 6-6 पिकल आणत होता आणि ती खात होती. मला आठवतं जेव्हा वेटर पिकल थोडे थोडे आणत होता तेव्हा ती त्याच्यावर चिडली आणि एकदाच प्लेटमध्ये का ठेवत नाही असं म्हणाली. जाकिर म्हणाला की, हे मला फारच लाजिरवाणं वाटलं. पण हैराण करणारी बाब म्हणजे ती खातच होती.

त्याने पुढे सांगितलं की, त्यानंतर तर आणखी मोठा कारनामा झाला. मी वॉशरूमला गेलो आणि परत आलो तर बघितलं की, तिने पोटभर खाऊन झाल्यावर बिल माझ्यासाठी सोडली आणि ती पसार झाली. मला त्या पिकलसाठी 140 डॉलर म्हणजे 11 हजार रूपये द्यावे लागले. जाकिरच्या या पोस्टवर खूप लोकांनी कमेंट केल्या. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल