शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

घ्या! आईला नाश्ता करता यावा म्हणून त्याने थांबवली रेल्वे, पण असं नसतं ना भौ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2019 13:18 IST

तुम्ही जर रेल्वेने कधी प्रवास केला असेल तर तुम्हाला माहीत असेल की, रेल्वेत आपातकालीन स्थितीत साखळी ओढून रेल्वे थांबवता येते.

तुम्ही जर रेल्वेने कधी प्रवास केला असेल तर तुम्हाला माहीत असेल की, रेल्वेत आपातकालीन स्थितीत साखळी ओढून रेल्वे थांबवता येते. पण तुम्हाला हेही माहीत असेल की, काहीही कारण नसताना उगाच ही साखळी ओढून रेल्वे थांबवली तर मोठा दंड किंवा तुरुंगवासाची शिक्षाही होऊ शकते. रेल्वेची साखळी ओढण्यासंदर्भातील एक अशीच वेगळी घटना सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

एक तरूण त्याच्या आईसोबत दिल्ली भोपाळ शताब्दी एक्सप्रेसने प्रवास करत होता. रेल्वेत नाश्ता दिला गेला. पण नाश्ता संपण्याआधीच त्यांचं स्टेशन आलं. आईचा नाश्ता व्हायचा होता आणि तिला नाश्ता शांततेने करता यावा म्हणून मुलाने रेल्वेची साखळी ओढून रेल्वे जास्त वेळासाठी जागेवर थांबवली.

मुलाचं नाव मनीष अरोरा आहे. त्याची आई आणि त्याला मथुरेला उतरायचं होतं. पण जेव्हा रेल्वे मथुरा स्टेशनला पोहोचली त्याची आई नाश्ता करत होती. त्यामुळे त्याने रेल्वेतील आपातकालीन साखळी ओढली. जेणेकरून काही वेळ रेल्वे मथुरा स्टेशनवरच थांबून रहावी. म्हणजे त्याचा आईचा नाश्ताही करणं होईल आणि दोघेही आरामात उतरतील.

(Image Credit : India Rail Info)

पण असं नसतं ना भौ....कारण कोणतही योग्य कारण नसताना रेल्वे थांबवणं हा एका गुन्हा आहे. आता काय....कोणतही योग्य कारण नसताना रेल्वेची साखळी ओढल्याने आणि रेल्वे थांबवल्याने मनीषला पकडण्यात आलं. त्याच्यावर रेल्वे अ‍ॅक्टच्या सेक्शन १४१ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. त्याने त्याचा गुन्हा कबूलही केला. पण नंतर त्याला जामीन देण्यात आला.

(Image Credit : meets some expectations)

आरपीएफ आग्रा डिव्हिजननुसार, यावर्षी जून महिन्यापर्यंत साधारण ६ लाख रूपये रेल्वेची साखळी ओढण्याचा आरोपात पकडण्यात आलेल्या प्रवाशांकडून वसूल करण्यात आलेत. आग्रा डिव्हिजन अंतर्गत आतापर्यंत साधारण ८५० प्रवाशी असं करताना पकडले गेले.

टॅग्स :delhiदिल्लीJara hatkeजरा हटकेIndian Railwayभारतीय रेल्वे