शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीच्या दोन बहिणींसोबत पतीने केलं लग्न, आता चौघेही एकाच घरात राहतात एकत्र....

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2022 13:56 IST

आश्चर्याची बाब म्हणजे या तिन्ही महिला बहिणी आहेत. लग्नानंतर तिघीही एकाच घरात एकत्र राहतात. या परिवारात एकूण 14 लोक आहेत. ज्यात 10 लहान मुलं आहेत. 

जगभरात सतत विचित्र घटना घडत असतात, कधी त्यांवर विश्वास बसत नाही तर कधी त्या हैराण करणाऱ्या असतात. प्रेमसंबंध किंवा नात्यांबाबत तर फारच अनोख्या घटना समोर येत असतात. अशीच एक घटना सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. एका व्यक्तीने तीन महिलांसोबत लग्न केलं. आश्चर्याची बाब म्हणजे या तिन्ही महिला बहिणी आहेत. लग्नानंतर तिघीही एकाच घरात एकत्र राहतात. या परिवारात एकूण 14 लोक आहेत. ज्यात 10 लहान मुलं आहेत. 

एका गावात राहणारा ओमबेनी Polygamy रिलेशनशिपमध्ये आहे. त्याच्या क्रिस्टीन, एलीन आणि टूमा नावाच्या तीन पत्नी आहेत. जेव्हा त्याने एलीन आणि टूमासोबत लग्न केलं तेव्हा त्याची पहिली पत्नी क्रिस्टीनने याचा विरोध केला नाही. उलट तिने ओमबेनीच्या इतर दोन लग्नाचं समर्थन केलं.यूट्यूब चॅनल Afrimax English सोबत बोलताना ओमबेनी याने सांगितलं की, तीन पत्नी असल्यामुळे लोक त्याच्याबाबत काहीही बोलतात. पण त्याला याने काही फरक पडत नाही. ओमबेनी म्हणाला की, आम्ही एकत्र आनंदी आहोत आणि आमच्यासाठी हे जास्त महत्वाचं आहे.

ओमबेनीने सांगितलं की, त्याच्या तिन्ही पत्नी त्याला खूप सपोर्ट करतात. त्यांच्यात नातं चांगलं आहे. घरातील कामे आणि मुलांचा सांभाळ त्या मिळून करतात. कुणातच वाद होत नाहीत. तिघीही एकमेकींचा सन्मान करतात आणि पती ओमबेनीवर एकसारखं प्रेम करतात.

जेव्हा ओमबेनीने पहिली पत्नी क्रिस्टीनकडे दुसरं लग्न करण्याचा विषय काढला तेव्हा तिने नकार दिला नाही. क्रिस्टीनने त्याला एलीनसोबत लग्न करण्याची परवानगी दिली. त्याचप्रमाणे जेव्हा ओमबेनीने टूमासोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा क्रिस्टीन आणि एलीनने नकार दिला नाही. 

दरम्यान एका छोट्या आणि कच्च्या घरात आल्यावर टूमाला थोडी अडचण होती. तिला ओमबेनीच्या इतर पत्नीबाबतही माहीत नव्हतं. पण जेव्हा क्रिस्टीन आणि एलीनने टूमाचं मनापासून स्वागत केलं तेव्हा टूमाला चांगलं वाटलं. तेव्हा ती एकत्र एका घरात राहण्यास तयार झाली. चौघांचंही मत आहे की, कधीना कधी गोष्टी बदलतील. त्यासाठी ते प्रयत्न करत राहणार.

ज्याप्रकारे ओमबेनीने तीन पत्नी आणि मुलांना सांभाळलं, क्रिस्टीन ओमबेनीचं खूप कौतुक करते. भलेही त्यांचं जीवन गरिबीत जात असेल, पण ते त्यांच्या जीवनात आनंदी आहेत. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInternationalआंतरराष्ट्रीय