शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

हसला असाल; पण रडायचं कसं हे कधी शिकलात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2020 05:34 IST

जपानमध्ये एक शिक्षक सध्या अनेकांना रडायला शिकवतोय. त्यासाठी तो क्लासेसही घेतो. जगभरात त्याची चर्चा सुरू आहे. कोण आहे हा शिक्षक आणि का रडायला शिकवतोय, हेच आपण जाणून घेणार आहोत.

आजपर्यंत हास्यकट्टे आपण बरेच पाहिले असतील. रोज सकाळी एका ठिकाणी एकत्र येऊन जोर-जोरात हसण्याची मैफल या कट्ट्यांवर रंगत असते. पण, जर कोणी रडण्यासाठी खटाटोप करत असेल, लोकांना रडायला शिकवण्यासाठी जिवाचा आटापिटा करत असेल तर?जपानमध्ये एक शिक्षक सध्या अनेकांना रडायला शिकवतोय. त्यासाठी तो क्लासेसही घेतो. जगभरात त्याची चर्चा सुरू आहे. कोण आहे हा शिक्षक आणि का रडायला शिकवतोय, हेच आपण जाणून घेणार आहोत.अनेकांच्या डोळ्यात आसवंच येत नाहीत. जपानी भाषेत याला रुई-कात्सू असे म्हणतात. याच रुई-कात्सूसाठी जपानचे हिदेफुमी योशिदा हे क्लासेस घेत आहेत. त्यांचा पहिला प्रश्न असतो, तुम्ही शेवटचं कधी रडला होता, कधी तुमच्या डोळ्यांतून आसवं बाहेर आली?रडू नका असं लहानपणापासूनच आपल्याला शिकवलेलं असतं. त्यामुळे मोठे झाल्यावरही आपण रडत नाही. आपली आसवं आपण दाबून ठेवतो. पण रडण्याचे अनेक फायदे आहेत. आपल्या मनावरचा ताण त्यामुळे कमी होतो, दु:ख कमी होते आणि मन मोकळे होते, असं योशिदा सांगतात. त्यासाठीच त्यांनी हे क्लासेस सुरू केले आहेत. ते सेमिनार घेतात. त्यात ते अनेक व्हिडिओ दाखवतात. मनात खोलवर कुठेतरी त्या दृश्यांचा परिणाम होतो आणि त्याचे रूपांतर मग रडण्यात होते. आसवं येतात, अशी त्यांची साधी-सोपी थिअरी आहे.रडू नका, हा विचारच लोकांच्या मनातून मला काढायचा असल्याचेही योशिदा सांगतात. जोपर्यंत मन मोकळं होत नाही, तोवर मनावरचा ताण कमी होणार नाही. त्यामुळे प्रसंगी रडणे हा उपाय असल्याचे ते म्हणतात.