शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

नशीबवान! घराची स्वच्छता करताना सापडलं 'असं' काही...; मिळाले 8 कोटी, आनंदाने झाला वेडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2023 14:34 IST

घराची साफसफाई करणे हे बर्‍याचदा त्रासदायक काम असतं, परंतु काहीवेळा ते अत्यंत फायद्याचं देखील ठरू शकतं.

घराची साफसफाई करणे हे बर्‍याचदा त्रासदायक काम असतं, परंतु काहीवेळा ते अत्यंत फायद्याचं देखील ठरू शकतं. मॅसाचुसेट्समधील एका रहिवाशाला घर साफ करताना 1 मिलियन डॉलर (सुमारे 8 कोटी 30 लाख रुपये) किमतीचं लॉटरीचं तिकीट सापडलं. या तिकीटामुळे एका रात्रीत त्याचं नशीब फळफळलं असून त्याला प्रचंड आनंद झाला आहे. 

मॅसाचुसेट्समधील खलील सौसा या व्यक्तीने काही महिन्यांपूर्वी 15 मिलियन डॉलरचं मनी मेकर स्क्रॅच लॉटरीचे तिकीट खरेदी केलं होतं. खलील सूसा यांनी सांगितले की ते तिकीट खरेदी केल्यानंतर ते विसरून गेले आणि नंतर घर साफ करताना तिकीट सापडले. सूसाने मॅसाचुसेट्स लॉटरीला सांगितलं की त्याच्या क्लिनरला अलीकडेच त्याच्या मेडफोर्डच्या घरातील फुलदाणीमध्ये तिकीट सापडलं. क्लिनरने तिकीट स्क्रॅच केलं. 

सीबीएस न्यूजनुसार, जेव्हा मॅसाचुसेट्सचे रहिवासी खलील सूसा यांनी एक मिलियनची लॉटरी जिंकली, तेव्हा त्यांनी एकरकमी रोख पेमेंट निवडले, याचा अर्थ 650,000 डॉलर मिळाले. सूसा यांनी लॉटरी अधिकार्‍यांना सांगितलं की, त्याला त्याच्या लॉटरीचा काही भाग गरजू मित्राला मदत करण्यासाठी दान करायचा आहे. 

सूसा म्हणाले की, त्यांचा मित्र आर्थिक परिस्थितीचा संघर्ष करत आहे आणि त्याला मदत करण्यास सक्षम झाल्यामुळे आनंदी आहे. सूसाने असंही सांगितलं की त्याची दान करण्याची आणखी काही योजना आहे. यावरून असे दिसून येते की लॉटरी विजेते केवळ स्वतःसाठी पैसे खर्च करत नाहीत तर इतरांना मदत करण्यासाठी देखील वापरतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Jara hatkeजरा हटके