शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

कचऱ्यात सापडलं वडिलांचं जुनं बॅंक पासबुक, रातोरात कोट्याधीश बनला मुलगा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2024 14:40 IST

चिलीमध्ये राहणारे एक्सिकेल हिनोजोसा आपल्या घरात सफाई करत होते. तेव्हा कचऱ्याच्या ढिगाऱ्यात त्यांना वडिलांचं ६० वर्ष जुनं पासबुक सापडलं.

कुणाचं नशीब कधी आणि कसं चमकेल काहीच सांगता येत नाही. कधी कधी तर कल्पनाही केली नसेल अशाप्रकारे लोकांचं नशीब चमकलं आहे. याचं नुकतंच एक उदाहरण समोर आलं आहे. एका व्यक्तीला कचऱ्यात कोट्यावधी रूपयांचा खजिना सापडला. यात काही सोनं किंवा हिरे नाही तर त्याला त्याच्या वडिलांचं ६० वर्ष जुनं बॅंक पासबुक सापडलं. या पासबुकच्या माध्यमातून व्यक्ती कोट्याधीश झाली आहे.

चिलीमध्ये राहणारे एक्सिकेल हिनोजोसा आपल्या घरात सफाई करत होते. तेव्हा कचऱ्याच्या ढिगाऱ्यात त्यांना वडिलांचं ६० वर्ष जुनं पासबुक सापडलं. या बॅंक खात्याबाबत त्यांच्या वडिलांशिवाय कुणालाही माहिती नव्हती. तर त्यांच्या वडिलांचं निधन १० वर्षाआधीच झालं होतं.

एक्सिकिलच्या वडिलांनी 1960-70 मध्ये घर खरेदी करण्यासाठी  एका बॅंकेत जवळपास 1.40 लाख पेसोस (चिली करन्सी) जमा केले होते. त्याची सध्याची व्हॅल्यू 163 डॉलर आहे. भारतीय करन्सीनुसार ही रक्कम 13,480 रूपये इतकी होते.व्यक्तीने लगेच बॅंकेला याची सूचना दिली. पण त्याचा आनंद लगेच गायब झाला.

मुळात ही बॅंक खूप आधीच बंद झाली होती. पण पासबुकवर स्टेट गॅरंटीड असा शब्द दिसला. याचा अर्थ असा होतो की, जर बॅंकेने पैसे दिले नाही तर सरकार पैसे देणार.नंतर या व्यक्तीने लगेच सरकारसोबत संपर्क केला. पण तिथेही काही झालं नाही. अशात व्यक्तीने कोर्टाकडे न्याय मागितला. कोर्टात सरकारविरोधात केस दाखल केली. त्यानी कोर्टात सांगितलं की, हे पैसे त्यांच्या वडिलांच्या मेहनतीची कमाई आहे. सरकारने ते परत देण्याचं आश्वासन दिलं होतं. 

व्यक्तीचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने सरकारला व्याजासहीत आणि महागाई भत्त्यासोबत व्यक्तीला १ बिलियन पेसो म्हणजे १.२ मिलियन डॉलर परत करण्याचा आदेश दिला. मात्र, सरकारने खालच्या कोर्टात या निर्णयाला आव्हान दिलं. सध्या यावर काही अपडेट नाही. जर निर्णय सरकारविरोधात आला तर व्यक्तीला साधारण १० कोटी रूपये मिळू शकतील.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल