शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीला सोडून पतीला प्रेयसीसोबत होतं रहायचं, स्वत:च्या निधनाचं रचलं नाटक; असा झाला भांडाफोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2023 15:08 IST

सोशल मीडियावर एका महिलेने आपल्या पतीच्या एका अशाच कारनाम्याचा खुलासा केला. महिलेने दावा केला की, केवळ आपल्या प्रेयसीसोबत रहायला मिळावं म्हणून पतीने आत्महत्येचं नाटक केलं.

एका पत्नीसाठी तिचा पती या जगातून जाणं ही फार त्रास देणारी बाब असते. ज्या पतीने सात जन्म सोबत राहण्याची शपथ घेतलेली असते, तो असाच मधे सोडून गेला तर पत्नीचं जगणं अवघड होऊन बसतं. काळानुसार पत्नीला एकटं जगण्याची सवय करावी लागते. एखाद्या कारणाने पतीचं निधन झालं आणि पत्नीला एकटं रहावं लागलं हे वेगळं, पण जर एखाद्या पत्नीला पतीच्या निधनाच्या नाटकामुळे आयुष्यभर विधवा म्हणून रहावं लागत असेल तर काय?

सोशल मीडियावर एका महिलेने आपल्या पतीच्या एका अशाच कारनाम्याचा खुलासा केला. महिलेने दावा केला की, केवळ आपल्या प्रेयसीसोबत रहायला मिळावं म्हणून पतीने आत्महत्येचं नाटक केलं. महिलेला विश्वास बसला होता की, तिच्या पतीचं निधन झालं. पण अचानक तिला समजलं की, तिचा पती त्याच्या प्रेयसीसोबत मेक्सिकोमध्ये आनंदाने जगत आहे.

कॅलिफोर्नियाच्या सॅन डिएगोमधील ही घटना आहे. इथे राहणाऱ्या अनेसा रोस्सीचं लग्न टीम नावाच्या व्यक्तीसोबत झालं होतं. नंतर दोघांमध्ये काही कारणाने वाद झाला. ज्यानंतर पाच महिने दोघे वेगवेगळे राहिले होते. यादरम्यान अनेसाला समजलं की, तिच्या पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आपल्या पतीच्या निधनाची बातमी समजल्यावर अनेसाला आपल्या रागाचा पश्चाताप झाला. ती दु:खात होती. नातेवाईकांसाठी शोकसभेचंही आयोजन करत होती. पण अशातच तिच्यासमोर सत्य आलं ज्यामुळे ती हैराण झाली.

महिलेला जेव्हा पतीचं सत्य समजलं तेव्हा तिला चांगलाच धक्का बसला. अनेसानुसार, तिचा पती इतके दिवस मेक्सिकोमध्ये त्याच्या 6 वर्ष जुन्या प्रेयसीसोबत राहत होता. आपल्यासोबत झालेल्या या घटनेची माहिती अनेसाने सोशल मीडियावरून दिली. दोघांचाही घटस्फोट झाला नव्हता, अशात अनेसाच त्याची कायदेशीर पत्नी मानली जाईल. तेच ही घटना समोर आल्यानंतर तिचा पती टीम याने तिच्या व्हिडीओवर कमेंट केली. टीम म्हणाला की, त्याने कधीच त्याच्या निधनाची अफवा पसरवली नाही. त्याने सांगितलं की, अनेसा त्याला घटस्फोट देत नव्हती. सोबत दोघांमध्ये मोठी भांडणं होत होती. त्यामुळे तो अनेसापासून दूर मेक्सिकोमध्ये राहत होता. अनेसा जे काही व्हिडिओत बोलली ते सगळं खोटं आहे.

टॅग्स :AmericaअमेरिकाMexicoमेक्सिको