शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
4
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
5
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
6
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
7
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
8
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
9
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
10
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
11
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
12
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
13
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
14
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
15
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
19
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
20
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

फक्त एका स्मुदीने तरुणाचं जगण केलं भयंकर, मृत्यूची भीक मागू लागला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2022 20:55 IST

एका एक्सपरिमेंटसाठी त्याने ही स्मूदी पिऊन आपला जीव धोक्यात टाकला (For experiment man drinks diarrhoea bacteria smoothie).

स्मुदी हा कित्येक लोकांचा आवडता पदार्थ. पण अशाच स्मूथीमुळे एक तरुण मृत्यूच्या दारात पोहोचला. स्मूदी खाल्ल्यानंतर त्याची अवस्था इतकी भयंकर झाली की त्याला डोळ्यासमोर अक्षरश: मृत्यू दिसू लागला. एका एक्सपरिमेंटसाठी त्याने ही स्मूदी पिऊन आपला जीव धोक्यात टाकला (For experiment man drinks diarrhoea bacteria smoothie).

२६ वर्षांचा रॅट जॅक एबर्टसने शिगेला ही खतरनाक बॅक्टेरिया असलेली स्मूदी प्यायला. हे बॅक्टेरिया डायरियासाठी कारणीभूत ठरतात. यावर उपचार शोधण्यासाठी मेरिलँड युनिव्हर्सिटीची संशोधक अभ्यास करत होते. या संशोधनात रॅट सहभागी झाला होता. हे जीवघेणे बॅक्टेरिया असलेली घाणेरडी स्मूदी तो प्यायला. त्यानंतर त्याची अवस्था भयावह झाली.

११ दिवसांचं हे एक्सपरिमेंट होतं. आपल्या ट्विटरवर तो आपला अनुभवही शेअर करायचा. एक्सपरिमेंटच्या सहाव्या दिवशी त्याने आपला अनुभव खूप वाईट असल्याचं सांगितलं. त्याचं पोट खूप खराब झालं. दोनवेळा तर वॉशरूममध्ये पोहोचण्याआधीच त्याला पॉटी झाली. त्यानंतर त्याला ताप आला, ब्लड प्रेशरही वाढलं.

पण यासाठी पैसे मिळत असल्याने आणि  जर या बॅक्टेरियाविरोधात लस तयार झाली तर दर वर्षी लाखो लोकांचा जीव वाचवता येऊ शकतो, यासाठी त्याने हे एक्सपरिमेंटचं चॅलेंज स्वीकारलं. शिगेला बॅक्टेरिया इतका खतरनाक आहे की दरवर्षी यामुळे लाखो लोकांचा मृत्यू होतो. लहान मुलं या बॅक्टेरियाच्या विळख्यात सापडतात. यानंतर वाचण्याची शक्यता खूप कमी होते.

जॅकने आपल्या अनुभवानुसार सांगितलं की, फक्त सहा तासांत त्याला मृत्यू प्रिय वाटू लागला. लहान मुलं कसा याचा सामना करत असतील, याचा विचार तो करू लागला. आता बरं झाल्यानंतर तो पाणी स्वच्छ करण्यासाठी पैसे जमा करू लागला आहे. ज्यामुळे बॅक्टेरिया कमी पसरेल.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके