शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

पतीला सोडून सासऱ्यासोबत रोमान्स करत होती सून, नंतर झाला धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2023 10:21 IST

Weird Relation : एक घटना ब्रिटनच्या साउथ वेल्समधून समोर आली आहे. इथे एका सासरा आणि सूनेने नात्यांची सीमा ओलांडून असं काम केलं ज्यामुळे मुलाला धक्का बसला.

Weird Relation : कोणतंही नातं हे विश्वासावर टिकून असतं. मग ते पती-पत्नीचं असो वा गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडचं असो. पण यातील कुणीही सीमा ओलांडली की, नातं टिकत नाही. अनैतिक संबंधांच्या अनेक अजब घटना नेहमीच समोर येत असतात. कधी तीन मुलांची आई प्रियकरासोबत पळून जाते तर कधी पती प्रेयसीसाठी पत्नीची हत्या करतो. तर कधी सासरा आणि सूनेचे प्रेम संबंध जुळतात. अशीच एक घटना ब्रिटनच्या साउथ वेल्समधून समोर आली आहे. इथे एका सासरा आणि सूनेने नात्यांची सीमा ओलांडून असं काम केलं ज्यामुळे मुलाला धक्का बसला.

मिरर वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, साउथ व्हेल्सच्या रॉन्डा (Rhondda, South Wales) मधील ही घटना आहे. इथे एक सून आपल्या सासऱ्याच्या प्रेमात पडली. हे जेव्हा पतीला समजलं तेव्हा फार उशीर झाला होता. रिपोर्टनुसार, डेकलन फुलरची 22 वर्षीय पत्नी स्टेफनीने त्याला दगा दिला होता. तिचे डेकलनचे 42 वर्षीय वडील डेरनसोबत संबंध होते. पती-पत्नीला एक 2 वर्षाची मुलगीही आहे. तिच्या देखरेखीसाठी त्यांनी घरात एक कॅमेराही लावला होता.

डेकलनचे वडील डेरन हे गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये कपलसोबत राहण्यासाठी आले होते. ते बेरोजगार होते आणि घरीच राहत होते. एक दिवस अचानक डेकलनने कॅमेरात पाहिलं की, पत्नी पुन्हा पुन्हा वडिलांच्या रूममध्ये जात आहे. दिवसाही तिला वडिलांच्या रूममध्ये जाताना पाहून त्याला विश्वास बसला की, दोघांमध्ये काहीतरी सुरू आहे. जेव्हा त्याने याबाबत पत्नीला विचारलं तर त्यांनी संबंधाची बाब कबूल केली. त्याहूनही मोठा खुलासा हा झाला की, स्टेफनी तिच्या सासऱ्याच्या बाळाची आई होणार आहे.

हे ऐकून डेकलनच्या पायाखालची जमिनच सरकली. स्टेफनीला जुळी मुलं होणार आहेत. तो या गोष्टीने निराश आहे की, त्यांची मुलगी आणि वडिलांच्या होणाऱ्या मुलांना हे नातं समजून घेणं किती लाजिरवाणं असेल. त्यांची मुलगी विलो तिच्या आजोबांची नातही असेल आणि सावत्र मुलगीही असेल. तर आजोबांचे जन्माला येणारी मुले विलोचे सावत्र भाऊ-बहिणही असतील आणि काका-आत्याही असेल. 

डेकलन आता पत्नीपासून वेगळा झाला आणि तो म्हणाला की, त्याने आता या दोघांशिवाय जगणं शिकलं आहे. दुसरीकडे स्टेफनी म्हणाली की, तिने दगा दिला नाही. ती म्हणाली की, डेकलन जेव्हा तिला सोडून गेला तेव्हा ती तिच्या सासऱ्यांच्या जवळ आली.

टॅग्स :relationshipरिलेशनशिपLondonलंडन