शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पतीनं पत्नीच्या कष्टानं जमवलेल्या पैशातून घेतला व्हिडिओ गेम, पत्नीनं असा धडा शिकवला की...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2021 18:11 IST

नुकत्याच घडलेल्या एका घटनेत पत्नीनं सेव्हिंग केलेल्या पैशांतून पतीनं व्हिडिओ गेम घेतल्याचं समोर आलं. त्यानंतर पत्नीनं जे काही केलं, त्यामुळे पतीलाही जोरदार धक्का बसला.

पत्नीनं (Wife) दरमहा बचत (Monthly savings) करून साठवलेल्या पैशांतून (money) तिच्या पतीनं (Husband) महागडा व्हिडिओ गेम (costly video game) खरेदी केला. हे पाहून त्याची पत्नी इतकी रागावली की तिच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. वास्तविक, अनेक घरांत बायका पैशांची बचत करताना तर पुरुष पैसे उधळताना दिसतात. त्यावरून अनेकदा कुटुंबात वादावादी होण्याचे प्रसंगही येत असतात. किती पैसे खर्च करायचे आणि किती सेव्ह करायचे, याची प्रत्येक कुटुंबाची आपापली गणितं असतात. मात्र प्रत्येक व्यवहार हा जोपर्यंत पारदर्शक असेल, तोपर्यंत नाती घटट् राहतात. नुकत्याच घडलेल्या एका घटनेत पत्नीनं सेव्हिंग केलेल्या पैशांतून पतीनं व्हिडिओ गेम घेतल्याचं समोर आलं. त्यानंतर पत्नीनं जे काही केलं, त्यामुळे पतीलाही जोरदार धक्का बसला.

सोशल मीडिया साईट रेडिट.कॉमवर एका ३५ वर्षांच्या महिलेनं तिच्या ३७ वर्षांच्या पतीसोबतचा एक संतापजनक अनुभव शेअर केला आहे. पत्नीनं गेल्या काही महिन्यांपासून पैसे साठवून ठेवले होते. आयत्या वेळी कुठल्याही खर्चासाठी असावेत, म्हणून हे पैसे तिने बाजूला ठेवले होते. मात्र पतीनं हे पैसे घेतले आणि ते खर्च करून त्याने महागडी व्हिडिओ गेम घेतली. पतीनं तब्बल ६० हजार रुपयांची व्हिडिओ गेम खरेदी केली आणि घरी आणली.

असा काढला रागआपल्या पतीनं आपल्याला न सांगता पैसे खर्च करून व्हिडिओ गेम आणल्याबद्दल त्याला धडा शिकवण्याचा निर्णय पत्नीनं घेतला. ज्यावेळी तिचा भाचा घरी आला, त्यावेळी तीच व्हिडिओ गेम गिफ्ट पेपरमध्ये पॅक करून तिने आपल्या भाच्याला गिफ्ट केली. हे पाहून पतीला काहीच बोलता आलं नाही, मात्र त्याचा भयंकर संताप झाला. सध्या त्याने आपल्याशी अबोला धरल्याचं पत्नीनं म्हटलं आहे.

बरा धडा शिकवलापत्नीनं पतीला बरा धडा शिकवला, अशी प्रतिक्रिया युजर्सनी दिली आहे. तर ही एक प्रकारची चोरीच आहे, असं सांगत नेटिझन्सची पतीवर टीका केली आहे.

 

टॅग्स :Jara hatkeजरा हटके