शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

अबब! ९०० किलो चिल्लर घेऊन तो पोहोचला BMW च्या शोरुममध्ये आणि...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2018 15:41 IST

काही लोक आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी काय करतील याचा काही नेम नाही. काहीजण आपली अनेक वर्षांची कमाई, एक एक पैसा जोडून आपली छोटी छोटी स्वप्ने पूर्ण करतात.

काही लोक आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी काय करतील याचा काही नेम नाही. काहीजण आपली अनेक वर्षांची कमाई, एक एक पैसा जोडून आपली छोटी छोटी स्वप्ने पूर्ण करतात. असंच एक प्रकरण चीनमध्ये समोर आलं आहे. इथे एक व्यक्ती एका ट्रकमध्ये ९०० किलो वजनाची चिल्लर घेऊन बीएसडब्ल्यूच्या शोरुममध्ये पोहोचला. त्याने ४८०,००० युआन म्हणजेच ५० लाख ६४ हजार रुपयांची नवीन बीएमडब्ल्यू खरेदी केली. 

चीनच्या Tongren शहरात काही दिवसांपूर्वी एक व्यक्ती पिकअप ट्रक घेऊन बीएमडब्ल्यूच्या कार शोरूममध्ये पोहोचला. शोरूमच्या कर्मचाऱ्यांना धक्का तेव्हा बसला जेव्हा त्याने सांगितले की, १५०, ००० नाणी आहेत आणि यातून त्याला नवीन कार खरेदी करायची आहे. कर्मचाऱ्यांना आधी हे सगळं फारच विचित्र वाटलं, पण शोरुमच्या मॅनेजरने त्याला नंतर कारही दिली. चिल्लर मोजण्यासाठी शोरूमला बॅंकेचे कर्मचारी बोलवावे लागले होते. 

असे सांगितले जाते की, कार खेरदी करणारा व्यक्ती एक बस ड्रायव्हर होता. एक लक्झरी कार खरेदी करण्याचं त्याचं स्वप्न होतं. यासाठी त्याने इतकी रक्कम जमा केली. यासाठी त्याने केवळ चिल्लर जमा केली आणि पाहता पाहता ही ५० लाखांची रक्कम झाली. मीडिया रिपोर्टनुसार, त्या व्यक्तीला याचा अंदाजही नव्हता की, त्याच्याकडे किती पैसे जमा झाले आहेत. मग त्याने आपल्या मित्रांच्या मदतीने  चार दिवसात सगळी चिल्लर रक्कम मोजून काढली. नंतर एका पिकअप ट्रकमध्ये त्याने ही रक्कम भरुन तो शोरुममध्ये गेला. 

आश्चर्याची बाब म्हणजे एकीकडे या व्यक्तीला आपलं स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद झाला होता तर दुसरीकडे ही चिल्लर मोजण्यासाठी ११ बॅंक कर्मचारी बोलवण्यात आले होते. त्यांना ही चिल्लर मोजण्यासाठी १० तासांचा वेळ लागला. त्यानंतर शोरुममध्ये टाळ्यांचा एकच कडकडाट झाला.  

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेchinaचीन