शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

'आइन्स्टाइनचा मेंदू' विकून श्रीमंत बनला तरूण, जाणून घ्या काय आहे त्याची आयडिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2024 12:27 IST

त्याचा दावा आहे की, जे लोक याला खरेदी करतात त्यांचा मेंदुही अल्बर्ट आइन्स्टाइनसारखा होतो.

महान सायंटिस्ट अल्बर्ट आइन्स्टाइन यांचा मेंदू सगळ्यात शार्प होता. त्यामुळे जेव्हा त्यांचा मृत्यू झाला तेव्हा एका डॉक्टरने त्यांचा मेंदू चोरी केला. नंतर समजलं की, या मेंदुचे दोनशे तुकडे करून ते रिसर्चसाठी वाटण्यात आले. यातून त्याने खूप कमाई केली. हा मेंदू सगळ्यांना तर मिळू शकत नाही. पण चीनचा एक तरूण ‘अल्बर्ट आइन्स्टाइनचा मेंदू’ विकून श्रीमंत झाला. त्याचा दावा आहे की, जे लोक याला खरेदी करतात त्यांचा मेंदुही अल्बर्ट आइन्स्टाइनसारखा होतो. खरेदी करणाऱ्या अनेकांनी याचे अनुभव शेअर केले. चला जाणून घेऊ या व्यक्तीची आयडिया...

साउथ चायना मार्निंग पोस्‍टच्या रिपोर्टनुसार, झांग जियांग्शी नावाचा हा तरूण उत्तर चीनच्या हेबेई प्रांतात राहणारा आहे. 5 वर्षाआधी झांग पैसे कमावण्याची आयडिया शोधत होता. जेणेकरून त्याचे खर्च भागावे. त्याने मित्रांशी चर्चा केली. यादरम्यान गमतीने एकाने त्याला म्हटलं की, तुझ्याकडे बुद्धी कमी आहे. झांग घरी परतला आणि विचार करू लागला. तेव्हा त्याला एक पेटलेला बल्ब दिसला आणि तेव्हाच त्याला आयडिया सुचली. झांगने विचार केला की, व्हर्चुअल 'आइन्स्टाइन ब्रेन’ बनवावा. जो तो विकेल आणि लोकांचा मेंदुही चांगला होईल. सुरूवातीला हा एक खेळ वाटला, पण लोकांना यात इंटरेस्ट दाखवला तर झांगने याचा बिझनेस बनवला. आता याची चीनी ऑनलाइन प्लॅटफार्म ताओबाओवर याची खूप डिमांड आहे.

तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, केवळ 0.5 युआन म्हणजे 6 रूपयांपेक्षाही कमी किंमतीत कुणीही याला खरेदी करू शकतं. झांगने दावा केला की, 'आइन्स्टाइनचा ब्रेन’ खरेदी करणारा व्यक्ती इंटेलिजंट होईल. झांगने आतापर्यंत 70 हजार लोकांना हा व्हर्चुअल मेंदू त्याने विकला. गेल्या दोन महिन्यात याची खूप डिमांड वाढली आहे. आता याला चीनमधील सगळ्यात मोठं ऑनलाईन प्लॅटफार्म अलीबाबावर याला विकलं जाणार आहे.

हजारो स्टुडंट चॅट शोमध्ये होतात सहभागी

याला खरेदी केल्यावर लोकांनी आपले अनुभव शेअर केले. काही म्हणाले की, ही एक शानदार गोष्ट आहे आणि याचा आपल्या मेंदुवरही प्रभाव दिसून येतो. पण जास्तीत जास्त लोक याला खेळ म्हणतात. म्हणाले की, याला खरेदी करणाऱ्यांना बुद्धीची गरज आहे. पण आइन्स्टाइनच्या मेंदुची नाही. झांगला याने काही फरक पडत नाही.  तो म्हणाला की, मला जास्तीत जास्त लोकांना आनंद द्यायचा आहे. त्यांच्यासोबत बोलण्यानेही मला आनंद मिळतो. या कारणाने चीनमध्ये अनेक विश्वविद्यालयांमध्ये त्याला लेक्चरसाठी बोलवलं जातं. त्याच्या  व्हर्चुअल चॅट शोमध्ये हजारो स्टुडंट सहभागी होतात.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स