शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमासाठी काय पण! 25 वर्षीय तरुणाने केलं 62 वर्षांच्या महिलेशी लग्न; 'या' गोष्टीमुळे होतोय मनस्ताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2023 16:22 IST

कुरानने स्वतःपेक्षा 37 वर्षांनी मोठ्या असलेल्या 62 वर्षांच्या महिलेशी लग्न केले आहे.

आपल्यापेक्षा वयाने मोठ्या महिलेशी लग्न केल्यामुळे 25 वर्षीय तरुण सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्याचे नाव कुरान मकॅन आहे. कुरानने स्वतःपेक्षा 37 वर्षांनी मोठ्या असलेल्या 62 वर्षांच्या महिलेशी लग्न केले आहे. दोघांचे पहिले अपत्यही लवकरच जन्माला येणार आहे. कुरान आणि त्याची पत्नी चॅरिल मकग्रेग हे दोघं इटलीच्या रोममध्ये राहतात. हे जोडपे टिकटॉकवर लोकप्रिय आहे. मात्र, आता लोक कुरानला खूप ट्रोल करत आहेत, त्यामुळे तो त्रस्त झाला आहे.

लोकांचे म्हणणे आहे की, नवीन लूकमुळे कुरान त्याच्या पत्नीपेक्षा वयाने मोठा दिसू लागला आहे. कुरान आणि चॅरिल एका व्हिडिओमध्ये डान्स करत आहेत, हजारो लोकांनी तो व्हिडीओ पाहिला आहे. मात्र यावर लोकांनी केलेल्या कमेंट्समुळे कुरान खूपच नाराज आहे. कुरानला त्याच्या नवीन हेअरस्टाईलमुळे लोक वृद्ध म्हणून चिडवत आहेत. एका यूजरने म्हटले, 'तुम्ही तुमच्या पत्नीपेक्षा वयाने मोठे दिसू लागलात, हे कसे शक्य आहे?' 

दुसऱ्या युजरने लिहिले की, 'हा म्हातारा आता तिच्यासारखाच दिसू लागला आहे.' त्याच वेळी, तिसऱ्या युजरने 'OMG तो आणखी वृद्ध दिसू लागला आहे असं म्हटलं आहे. कुरान आणि चॅरिलचे पहिले अपत्य सरोगसीतून होणार आहे. चॅरिल आधीच चार मुलांची आई आणि 17 मुलांची आजी आहे. दोघांची पहिली भेट 2012 मध्ये झाली होती. केअरटेकर कुरान तेव्हा अवघा 15 वर्षांचा होता. तो एका फास्ट फूड रेस्टॉरंटमध्ये काम करायचा, जे चॅरिलचा मुलगा ख्रिस चालवतो. 

नोव्हेंबर 2020 मध्ये, कुरानने पहिल्यांदा चॅलला एका स्टोअरमध्ये कॅशियर म्हणून काम करताना पाहिले, जेव्हा तो तिच्या प्रेमात पडला. कुरानने जुलै 2021 मध्ये चॅरिलला प्रपोज केले आणि दोघांनी त्याच वर्षी लग्न केलं. कुरानने चॅरिलला खूप महागडी अंगठी देऊन प्रपोज केलं. तो म्हणतो की चॅरिलला पत्नी म्हणून निवडण्यामागे अनेक कारणे आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Jara hatkeजरा हटके