शहरं
Join us  
Trending Stories
1
“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
3
काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय
4
शिक्षिकेचं १३ वर्षाच्या विद्यार्थ्यासोबतच जुळलं सूत, पळूनही गेली; मानसी म्हणाली, 'माझ्या गर्भात त्याचं बाळ'
5
कर्ज नको म्हणून दिव्यांगाचा काढला विमा; हत्या करुन हडपले लाखो रुपये, 'असा' झाला पर्दाफाश
6
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
7
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
8
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
9
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
10
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
11
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
12
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
13
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
14
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
15
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
16
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
17
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
18
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
19
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
20
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट

नारी शक्ती! एकाच वेळी तब्बल 4 सिलिंडर उचलते 'ही' महिला कारण...; डोळे पाणावणारी 'ती'ची गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2022 13:18 IST

एक महिला एकावेळी तब्बल 4 सिलिंडर घेऊन जात असल्याचं पाहायला मिळत आहे.

एका गॅस सिलिंडरचं वजन हे जवळपास 30 किलो असतं. हा सिलिंडर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी न्यायचा म्हटलं म्हटला तरी अनेकांच्या नाकीनऊ येतात. बरीच मेहनत घ्यावी लागते. सध्या सोशल मीडियावर एक फोटो जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये एक महिला एकावेळी तब्बल 4 सिलिंडर घेऊन जात असल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या ही महिला चर्चेचा विषय ठरली आहे. एकाच वेळी चार सिलिंडर नेण्याच्या तिच्या हटके ट्रिकने सर्वच जण हैराण झाले आहेत. 

मलेशियाच्या टेरेंगगनूमध्ये राहणारी 30 वर्षांची खैरूनीसा गेल्या तीन वर्षांपासून गॅस सिलिंडर सप्लायरचं काम करते. एकाच वेळी ती एकत्र दोन सिलिंडर जिन्यांवर चढवते आणि उतरवते. तर जमिनीवर ती सहजपणे एकाच वेळी चार सिलिंडर एकत्र खेचू शकते. सिलिंडर उचलतानाचा तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ती गेल्या महिन्यांपासून हे काम करत आहे. आधी हे काम फक्त पुरुष मंडळी करत होती. पण आता खैरूनीसा अत्यंत कष्टाने हे काम करताना दिसून येत आहे. 

एकाच वेळी इतके सिलिंडर उचलायला खैरूनीसा गेल्यावर्षीच शिकली. त्यावेळी कंपनीकडे मनुष्यबळ कमी होतं. आता ती आपल्या या कामात एक्सपर्ट झाली आहे. एका दिवसात ती जवळपास 60 ते 100 गॅस सिलिंडर डिलिव्हर करते. सुरुवातीला सिलिंडर उचलणारी महिला म्हणून लोक तिच्याकडे आश्चर्याने पाहायचे. कारण सामान्यपणे हे काम पुरुषांचं आहे, असंच समजलं जातं. त्यामुळे महिलेला सिलिंडर उचलताना पाहून लोकांना विचित्र पाहायचं. पण आता लोकांनाही खैरूनीसाला सिलिंडर उचलताना पाहण्याची सवय झाली आहे. 

खैरूनीसाने सांगितलं की पतीच्या निधनानंतर ती आपल्या सासूची काळजी घेते. त्यासाठी मिळेल ती काम ती करते. ट्रक चालवण्यापासून गॅस सिलिंडरही तिला डिलिव्हर करावा लागला. नेहमी ती अशी कामं कुणाच्याही मदतीशिवाय करायची. खैरूसीनाला अशी मेहनत करताना पाहून लोकांनीही तिचं भरभरून कौतुक केलं आहे. काहींनी तिच्यासाठी मदतीचा हातही पुढे केला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Jara hatkeजरा हटके